ETV Bharat / bharat

आसाममधील तेल विहिरीला लागलेली आग अखेर १७३ दिवसांनंतर आटोक्यात! - बाघजन तेल विहीर आग

सप्टेंबर महिन्यात ही आग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे ऑइल इंडियाने सांगितले होते. ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी एकूण १७३ दिवसांचा कालावधी लागला.

Baghjan fire has been doused
आसाममधील तेल विहिरीला लागलेली आग अखेर १७३ दिवसांनंतर आटोक्यात!
author img

By

Published : Nov 15, 2020, 1:22 PM IST

गुवाहाटी : आसामच्या बाघजनमधील तेल विहिरीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी एकूण १७३ दिवसांचा कालावधी लागला.

सप्टेंबरपासून सुरू होते कूलिंग..

सप्टेंबर महिन्यात ही आग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे ऑइल इंडियाने सांगितले होते. ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. "बाघजनमधील पाच नंबरच्या विहिरीला लागलेली आग ही काही प्रमाणात दुसरीकडे वळवण्यात आली आहे. या विहिरीच्या तोंडावरील दाब कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ही विहिरच नष्ट करण्याच्या दिशेने आम्हाला पाऊल उचलता येईल. तेलविहिरीला लागलेली आग आणि वायूगळती ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी मात्र आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. ऑइल कंपनीचे इंजिनिअर, अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि विदेशी तज्ज्ञ हे सर्व युद्धपातळीवर यासाठी काम करत आहेत", अशी माहिती ऑइल कंपनीचे प्रवक्ते आणि उपमहाव्यवस्थापक त्रिदिव हझारिका यांनी दिली होती.

९ जूनला लागली होती आग..

२७ मेपासून या विहिरीतून वायू उत्सर्जन होत होते. त्यानंतर ९ जूनला याठिकाणी आग लागली होती. या आगीमध्ये कंपनीच्या दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील आणि गावांमधील तब्बल नऊ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. तसेच, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच होते.

विदेशी तज्ज्ञांना पाचारण..

ही आग विझवण्यासाठी तीन विदेशी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. २२ जुलैला विहीर क्र. पाचमध्येच पुन्हा एकदा स्फोट झाला होता. यामध्ये तीन विदेशी तज्ज्ञ जखमी झाले होते. अँथनी स्टीवन रेनॉल्ड्स, डग डल्लास आणि क्रेग नील डंकन अशी या तिघांची नावे आहेत. यासोबतच, आग विझवण्यासाठी कॅनडामधून स्नबिंग मशीन मागवण्यात आली होती.

हेही वाचा : पाक लष्कराच्या गोळीबारात आसामधील जवानाला वीरमरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.