रायपूर : राजधानी रायपूरमधील गुढियारी येथे सुरू असलेल्या रामकथा पठणाच्या वेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, एक काळ होता जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते आणि घोषणा देत होते की, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. पण आज आपल्याला हिंदु राष्ट्र बनवण्याची गरज आहे. आज मी घोषणा देतो की, तुम्ही मला साथ द्या, आम्ही हिंदू राष्ट्र बनवू. राजधानी रायपूरमध्ये १७ ते २३ जानेवारी दरम्यान रामकथा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ही कथा बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री करत आहेत. या दरम्यान धीरज शास्त्री यांनी लोकांना सतत सनातन धर्मासोबत येण्याचे आवाहन करत आहेत. तसेच हिंदू राष्ट्रासाठी आवाज उठवला आहे.
हिंदु राष्ट्राचा नवा नारा : धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, सर्व सनातन धर्मातील लोकांनी संघटित होऊन त्यासाठी एकत्र यावे. पहिला चमत्कार हा आज भारतातील हिंदू एकत्र येत आहेत, दुसरा चमत्कार बागेश्वर धाममध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरा चमत्कार तुमच्यातील सनातनचा एक थेंबही असेल तर, तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला हिंदू राष्ट्र देईन. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ना मला राजकारणी व्हायचे आहे, ना माझा कोणताही पक्ष आहे, ना मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार आहे. आपल्याला फक्त सनातन्यांना एकत्र आणण्याबद्दल बोलायचे आहे.
चमत्कार पाहायला दरबारात : याआधीही शुक्रवारी रायपूर येथे बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरला होता. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्यांचे चमत्कार पहायला दरबारात पोहोचले नाहीत. महाराज वारंवार मंचावरून आव्हानकर्त्यांना प्रतिआव्हान देताना दिसत होते. जे आज येऊ शकले नाहीत त्यांनी उद्या दरबारात यावे, असेही ते म्हणाले होते. रायपूर येथील बागेश्वर धाम महाराजांच्या दरबारात धीरेंद्र महाराज यांनी मंचावरून घोषणा केली. ते म्हणाले की, आव्हानकर्त्यांनी या दिव्य दरबारात यावे. येथे कोणतेही टोकन किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा खुला दरबार आहे. येथे कोणीही येऊ शकते. कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी मंचावर आव्हानकर्त्यांना वारंवार आमंत्रित केले होते. परंतु कोणीही त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही.