ETV Bharat / bharat

योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली दिलगिरी, वक्तव्य घेतले मागे

author img

By

Published : May 24, 2021, 7:27 AM IST

Updated : May 24, 2021, 1:45 PM IST

रामदेव बाबा म्हणाले, की मी सर्व वैद्यकीय उपचार पद्धतींचा आदर करतो. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेत आहे. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

Baba Ramdev retracts statement; Says he respects all forms of medicine
'अ‌‌ॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य मागे घेतो; भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी' - बाबा रामदेव

नवी दिल्ली : योगगुरू म्हणून ओळखले जाणारे रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीबाबतचे आपले वक्तव्य मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या पत्रानंतर रामदेव बाबांनी दिलगिरी व्यक्त केली.

रामदेव बाबा म्हणाले, की मी सर्व वैद्यकीय उपचार पद्धतींचा आदर करतो. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेत आहे. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

काय म्हणाले रामदेव बाबा?

रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अ‌ॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अ‌ॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अ‌ॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते.

हर्षवर्धन यांनी लिहिले पत्र..

याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेत थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी योगगुरु रामदेव यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीविरोधातील आपले आक्षेपार्ह विधान मागे घेण्यास सांगितले होते. आरोग्य कर्मचारी दररोज देशवासियांसाठी कोरोनाविरोधात लढा देत आहेत. या विधानामुळे 'कोरोना योद्धा' यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे हर्ष वर्धन म्हणाले होते.

हेही वाचा : गोव्यातील स्तनदा मातांचे लसीकरण करण्याची तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीची शिफारस

Last Updated : May 24, 2021, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.