ETV Bharat / bharat

Patanjali FPO : शेअर गोठविल्यानंतर पतंजली फूड्स आणखी आणणार एफपीओ, बाबा रामदेव यांचा मोठा निर्णय

अल्पावधीत बाजारपेठेचे मोठा हिस्सा काबीज करणाऱ्या पतंजली फूड्सने मोठा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कंपनी आणखी एक एफपीओ आणणार आहे. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनी दिली आहे. त्यादृष्टीने कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.

Patanjali
बाबा रामदेव
author img

By

Published : Mar 16, 2023, 6:39 PM IST

Updated : Mar 16, 2023, 6:53 PM IST

डेहराडून : पतंजली फूड्सकडून एप्रिलपासून एफपीओ आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. बाबा रामदेव यांनी पतंजली फूड्ससाठी आणण्यात येणाऱ्या नवीन एफपीओबाबत माहिती दिली आहे. स्टॉक एक्सचेंज एनएसई आणि बीएसईने बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली ग्रुप फर्म पतंजली फूड्सच्या प्रवर्तकांचे शेअर्स गोठवले आहेत.पतंजली फूड्सने याबाबत सांगितले की या निर्णयाचा कंपनीच्या कामकाजावर प्रत्यक्षात परिणाम होणार नाही. कंपनीकडून सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी एप्रिलमध्ये फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शेअर्स गोठविल्याने कंपनीवर काय होणार परिणाम? कंपनीच्या प्रवर्तकांचे शेअर गोठविले असताना रामदेव यांनी त्यांचे गुंतवणूकदार आणि सार्वजनिक भागधारकांना आश्वासन दिले. त्याबाबत बाबा रामदेव म्हणाले की पतंजली फूड्स लिमिटेड (PFL) च्या नेहमीच्या कामकाजावर आणि आर्थिक कामगिरीवर त्याचबरोबर कंपनीच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ते पुढे म्हणाले, की गुंतवणूकदारांना काहीच काळजी करण्याची गरज नाही. रामदेव यांच्या दाव्यानुसार, सेबीने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 8 एप्रिल 2023 पर्यंत प्रवर्तकांचे शेअर्स आधीच लॉक-इन आहेत. ते सूचीबद्ध झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष तसेच राहणार आहेत. स्टॉक एक्सचेंजच्या या निर्णयाचा बाजारावर कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.

नेमका कधी एफपीओ येणार?पीएफएल पतंजली समूह आदर्श पद्धतीने चालविण्यात येत असल्याचा दावादेखील बाबा रामदेव यांनी केला. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार आणि वितरण, नफा आणि कामगिरी या सर्व घटकांची काळजी घेण्यात येत आहे. कंपनी सुमारे सहा टक्के हिस्सा विकत आहोत. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. बाजारातील परिस्थिती प्रतिकूल असल्याने उशीर झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. नेमका कधी एफपीओ येणार याबाबत बाबा रामदेव म्हणाले, की चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेचच एप्रिलमध्ये एफपीओ प्रक्रिया सुरू करण्यात आहोत. त्यामधून गुंतवणूक करण्यास तयार आहोत.

21 प्रवर्तक संस्थांचे गोठविले शेअर्स - नुकतेच पतंजली फूड्स लिमिटेडने (PFL) माहिती दिली की बीएसई आणि एनएसईने पतंजली आयुर्वेद आणि कंपनीचे आचार्य बालकृष्ण, पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठ हरिद्वारचे सह-संस्थापक यांच्यासह त्यांच्या 21 प्रवर्तक संस्थांचे शेअर्स गोठवले आहेत. 18 डिसेंबर 2019 रोजी कंपनीची सार्वजनिक भागीदारी 25 टक्के आणि 10 टक्क्यांवरून कमी करण्यात आली होती. त्यामुळे नियमानुसार 18 डिसेंबर 2022 पूर्वी एमपीएस 25 टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक होते. ते करण्यात आले नव्हते. यापूर्वी कंपनीने मार्च, 2022 मध्ये एफपीओ आणल्यानंतर 648 रुपयांच्या प्रीमियमवर प्रत्येकी 2 रुपयांचे 6.61 कोटी इक्विटी शेअर्स वाटप करण्यात आले होते.

हेही वाचा : Chopper of Indian Army Missing : अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्यदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू

Last Updated : Mar 16, 2023, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.