ETV Bharat / bharat

कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात का झाला होता वाद, मुलाने केला खुलासा - Kanta Prasad

कांता प्रसाद आणि युट्यूबबर गौरव वासन यांच्यात झालेल्या वादासंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. मॅनेजर तुशांतने बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती कांता प्रसाद यांच्या मुलाने दिली.

बाबा का ढाबा
बाबा का ढाबा
author img

By

Published : Jun 19, 2021, 7:40 AM IST

नवी दिल्ली - 'बाबा का ढाबा' पुन्हा चर्चेत आला आहे. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच कांता प्रसाद आणि युट्यूबबर गौरव वासन यांच्यात झालेल्या वादासंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. मॅनेजर तुशांतने बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गौरव वासनविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती कांता प्रसाद यांच्या मुलाने दिली.

कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यातील वादाचे कारण?

यूट्यूब गौरव वासनच्या धाकट्या भावाचा आणि बाबांचा मॅनेजर तुशांत यांच्यात काही कारणांवरून भांडण झाल्याचे कांता प्रसाद यांच्या मुलाने सांगितले. त्यानंतरच तुशांतनेच बाबांच्या मनात गौरवविषयी विष कालवलं आणि मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये गौरव वासनविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. एक वकिल स्वत:हून बाबांकडे आला आणि त्याने केस नि: शुल्क लढवण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर तो वकिल गायब झाला. कित्येक महिन्यांपासून तो बाबांना भेटलेला सुद्धा नाही, असेही त्यांनी सांगितले.

कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात भांडण झाले नाही. बाबांच्या मॅनेजर तुशांतने संपूर्ण वाद सुरू केला. मॅनेजरनेच गौरव वासनवर गुन्हा दाखल केला होता. बाबा कधी कोर्टात गेले नाहीत. मॅनेजर तुशांत आणि वकील कोर्टात जाऊन खटला लढवत राहिले. वकिलासह बाबाचा मॅनेजर तुशांतही बेपत्ता आहे, अशी माहिती बाबाच्या मुलाने दिली.

बाबा का ढाब्यातून प्रसिद्ध झालेले कांता प्रसाद दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबा कांता प्रसाद व्हेंटिलेटरवर आहेत. कांता प्रसाद यांनी दारू पिल्यानंतर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यांच्या मुलाचा जवाबही नोंदविण्यात आल्याचे दक्षिण पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनामुळे रेस्टॉरंट पडले बंद...

दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदतीतून त्यांनी ढाबा बंद करत नवे रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट तोट्यात गेल्याने कांता प्रसाद यांना ते बंद करावे लागले. त्यांनी रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, आर्थिक अडचणी सुटत नसल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

फूड ब्लॉगरमुळे प्रसिद्ध झाले होते कांता प्रसाद -

कोरोनामुळे बर्‍याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांचेही कोरोनाव्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी फूड ब्लॉगर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद रडताना दिसत होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हा धाबा चालवणाऱ्या दोन वयोवृद्ध कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र, त्यानंतर कांता आणि गौरवमध्ये वाद झाला आणि गौरवविरोधात कांता प्रसाद यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, चूक लक्षात आल्यानंतर कांता प्रसाद यांनी गौरवची माफी मागितली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.