ETV Bharat / bharat

Baalveer :शौर्य आणि धाडसाचे प्रतिक आहेत आद्रिका आणि कार्तिक; जाणून घ्या ग्वाल्हेरमधील भाऊ-बहिणीची कथा

author img

By

Published : Nov 11, 2021, 1:53 PM IST

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील आद्रिका आणि कार्तिकने हिंसाचारामध्ये भुकेने आणि तहानलेल्या लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या अदम्य साहस आणि सेवेबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा गौरवही केला आहे. वय हे अनुभव देते. पण शौर्य आणि धाडस हे वयाच्या मर्यादेपलीकडे असते. मुरैना येथील रहिवासी आद्रिका आणि तिचा भाऊ कार्तिक यांनी हे सिद्ध केले आहे.

baalveer-adrika-and-kartik-saved-lives-of-hungry-and-thirst-passengers-by-giving-them-food-president-honored-them-with-nation-children-award-gwalior
शौर्य आणि धाडसाचे प्रतिक आहेत आद्रिका आणि कार्तिक; जाणून घ्या ग्वाल्हेरमधील भाऊ-बहिणीची कथा

ग्वाल्हेर - धाडसातून आणि आपल्या कामगिरीतून शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (Baalveer) दिला जातो. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील आद्रिका आणि कार्तिकने हिंसाचारामध्ये भुकेने आणि तहानलेल्या लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या अदम्य साहस आणि सेवेबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा गौरवही केला आहे.

जाणून घ्या ग्वाल्हेरमधील भाऊ-बहिणीच्या धाडसाची कथा....

वय हे अनुभव देते. पण शौर्य आणि धाडस हे वयाच्या मर्यादेपलीकडे असते. मुरैना येथील रहिवासी आद्रिका आणि तिचा भाऊ कार्तिक यांनी हे सिद्ध केले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात आद्रिका आणि कार्तिकने समाजसेवा करण्याचे ठरवले. यासाठी राष्ट्रपतींनी 2019 मध्ये त्यांचा गौरव केला होता. शौर्य आणि समाजसेवेसाठी त्यांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भुकेल्या तहानलेल्यांसाठी जागृत वेदना -

तो 2 एप्रिल 2018 ला ग्वाल्हेरच्या चंबळ भागात दलित आंदोलनाचा हिंसाचार उसळला होता. मुरैना जिल्ह्यातही हिंसाचार आणि दहशतीचे वातावरण होते. भीतीमुळे लोक घरात कैद झाले होते. दगडफेक सुरू होती. तर रेल्वे रुळांवर आंदोलकांनी ताबा मिळवला होता. अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर थांबल्या. या गाड्यांमध्ये हजारो लोक अडकले. हजारो प्रवासी भुकेने तहानलेले होते. 10 वर्षांची अद्रिका आणि तिचा भाऊ कार्तिक त्यांच्या घरातील टीव्हीवर हे सर्व पाहत आणि ऐकत होते. स्टेशनच्या अगदी समोर त्याचं घर होतं. यावेळी दोघांनी त्या लोकांची मदत करण्याचे ठरवले.

10 वर्षे वय आणि आश्चर्यकारक धैर्य -

बहिणी आणि भावांनी घरातूनच खाण्यापिण्याचे सामान एका पिशवीत भरले आणि पालकांना न सांगता रुळांकडे निघाले. दोघेही रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना थांबवले आणि सांगितले, येथून जा, जीवाला धोका आहे. पण आद्रिका आणि कार्तिक यांनी पीडित लोकांना मदत करण्याचा निर्धार केला होता. दोघेही वेगवेगळ्या मार्गाने कसेतरी

रेल्वेमध्ये अडकलेले प्रवासी कमालीचे घाबरले होते. सुरुवातीला त्यांनी डब्याचे दरवाजेही उघडले नाहीत. पण दोन लहान मुलांनी काही खाद्यपदार्थ आणल्याचे पाहून त्यांच्यात जीव आला. घरून जे काही सामान आणले होते. ते प्रवाशांमध्ये वाटले. दरम्यान, आद्रिका आणि कार्तिकची आईही त्यांना शोधत तेथे पोहोचली. दोघांनाही तेथून जाण्यास सांगितले. मात्र मुलांनी घरी जाण्यास नकार दिला. त्यापेक्षा घरात जे काही खाण्यापिण्याचे आहे ते सर्व आणा असे वडिलांना सांगितले. भूक आणि तहानने व्याकूळ असलेल्यांना आम्ही सोडू शकत नाही, असे त्यांनी वडिलांना सांगितले. मुलांच्या धैर्यापुढे त्यांनाही नतमस्तक व्हावे लागले. ते घरी गेले, खाण्यापिण्याचे पदार्थ गोळा केले आणि आजूबाजूच्या लोकांसह पुन्हा स्टेशनवर पोहोचले.

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव -

आंदोलन शांत झाल्यानंतर लोकांना अद्रिका आणि कार्तिकच्या कामगिरीची माहिती मिळाली. त्यांच्या धाडसाची आणि सेवेची देशभर चर्चा होत होती. अनेक ठिकाणी लोकांनी त्यांचा आदर केला. हळूहळू त्यांची चर्चा राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली. 24 जानेवारी 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती भवनात समाजसेवेसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 26 जानेवारीच्या विशेष परेडमध्येही त्यांचा समावेश होता. 10 वर्षांची आद्रिका आणि तिचा भाऊ कार्तिक यांच्या शौर्य आणि समाजसेवेच्या बातम्या माध्यमांमध्ये हेडलाइन बनल्या. मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि बॉलीवूडमधील अनेक चित्रपट कलाकारांनी भाऊ-बहिणीचा सन्मान केला आहे. नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. आद्रिकाची चर्चा सातासमुद्रापारही सुरू आहे. लंडनमध्ये प्रिन्सेस डायना यांच्या स्मरणार्थ त्यांना स्टँडिंग हिरो फ्रॉम इंडिया या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 'एजाज'ची जगण्यासाठी धडपड, उदरनिर्वाहसाठी करतोय मजूरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.