लखनऊ Ayodhya Ram Temple Deepotsav : सध्या राम मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. अयोध्येत जगप्रसिद्ध दीपोत्सव कार्यक्रमाची तयारीही आता अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत 11 नोव्हेंबरला राम की पैडीवर 21 लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्यात येणार आहे. या उत्सवात दरवर्षी धार्मीक कार्यक्रम, कथा, प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. 21 लाख दिवे लाऊन एक विश्वविक्रम केला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे.
-
आगामी दीपोत्सव के दृष्टिगत प्रमुख सचिव पर्यटन एवं संस्कृति महोदय के साथ मुख्य दीपोत्सव स्थल राम की पैड़ी पर दीपोत्सव की तैयारियों का जायजा लिया गया। सम्बन्धित विभागों के अधिकारियों को समस्त तैयारियों को अपेक्षित समय में पूर्ण करने के निर्देशित किया गया। pic.twitter.com/GLdJaP7u1I
— District Magistrate, Ayodhya UP (@dmayodhya) October 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आगामी दीपोत्सव के दृष्टिगत प्रमुख सचिव पर्यटन एवं संस्कृति महोदय के साथ मुख्य दीपोत्सव स्थल राम की पैड़ी पर दीपोत्सव की तैयारियों का जायजा लिया गया। सम्बन्धित विभागों के अधिकारियों को समस्त तैयारियों को अपेक्षित समय में पूर्ण करने के निर्देशित किया गया। pic.twitter.com/GLdJaP7u1I
— District Magistrate, Ayodhya UP (@dmayodhya) October 18, 2023आगामी दीपोत्सव के दृष्टिगत प्रमुख सचिव पर्यटन एवं संस्कृति महोदय के साथ मुख्य दीपोत्सव स्थल राम की पैड़ी पर दीपोत्सव की तैयारियों का जायजा लिया गया। सम्बन्धित विभागों के अधिकारियों को समस्त तैयारियों को अपेक्षित समय में पूर्ण करने के निर्देशित किया गया। pic.twitter.com/GLdJaP7u1I
— District Magistrate, Ayodhya UP (@dmayodhya) October 18, 2023
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 21 ऑक्टोबरला अयोध्येत : अयोध्येत होणाऱ्या सामूहिक दीपोत्सव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. पर्यटन विभागाचे मुख्य सचिव मुकेश मेश्राम बुधवारी संध्याकाळी अयोध्येत दाखल झाले आहेत. दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचा मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी आढावा घेतला. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 21 ऑक्टोबरला अयोध्येत जाणार आहेत. यावेळचा कार्यक्रम भव्य व्हावा, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एक दिवस अयोध्येत मुक्काम करणार आहेत. दीपोत्सव आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेणार असल्याची माहिती मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी दिली आहे.
दीपोत्सवातून भारतीय संस्कृतीचा प्रचार : अयोध्येत दरवर्षी दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यावर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. पर्यटन आणि संस्कृती विभागाचे मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी बुधवारी आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दीपोत्सवाची तयारी अगोदरच केली जाते. त्याला यावर्षी भव्यता देण्यात येणार आहे. यावर्षी 21 लाख मातीचे दिवे लाऊन नवा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यावेळी दीपोत्सवात भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यात येणाऱ्या देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राम की पौडीवर भव्य लाईटींग : दीपोत्सवानिमित्त 4 दिवस राम की पैड़ी इथं लाइट अँड साउंड शो आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत आम्ही विचार करत असल्याची माहिती पर्यटन विभागाचे मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी दिली. ही लाईटींग दररोज राम की पौडीवर लावण्यात यावी, आणि ही प्रणाली 365 दिवस चालली पाहिजे, अशी तयारीही आम्ही करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांचं मनोरंजन करण्याची तयारी करत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अयोध्येतील अध्यात्माची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी आम्ही चर्चा करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अयोध्येला लागून असलेल्या सूर्यकुंडमध्ये लाइट अँड साउंड शोचा कार्यक्रम आधीच आयोजित केला जात असल्याचंही मुख्य सचिव मुकेश मेश्राम यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :