ETV Bharat / bharat

राम मंदिरांसह मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी,पोलिसात गुन्हा दाखल

Ram Temple Threat : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर आणि एसटीएफ एडीजी यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Ram Temple Threat
Ram Temple Threat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 8:13 AM IST

Updated : Jan 1, 2024, 8:18 AM IST

लखनौ Ram Temple Threat : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिर आणि एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांच्यासह भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळालीय. यामुळं एकच खळबळ उडालीय. ही धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. शेतकरी नेत्याच्या तक्रारीवरुन सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केलाय.

आयएसआयशी संबंधित व्यक्ती असल्याचा संशय : भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना झुबेर खान नावाच्या व्यक्तीच्या ई-मेल आयडीवरुन धमकी देण्यात आलीय. या ई-मेलमध्ये झुबेरनं स्वत: आयएसआयशी संबंधित असल्याचं सांगितलं. त्याचवेळी देवेंद्र तिवारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासोबतच एटीएस आणि एसटीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. या पोलीस पथकांशिवाय अनेक तपास यंत्रणाही ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 27 डिसेंबरच्या संध्याकाळी देवेंद्रला झुबेर खानच्या नावानं ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलनंतर देवेंद्र तिवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (पुर्वीचं ट्विटर) उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करुन या प्रकरणाची माहिती दिली.

यापुर्वीही आली धमकी : देवेंद्र तिवारी यांना आलेल्या ई-मेलमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफ एडीजी अमिताभ यश आणि देवेंद्र तिवारी यांना गोसेवक म्हणत बॉम्बची धमकी देण्यात आली होती. यासोबतच अयोध्येत बांधण्यात येत असलेलं भगवान श्रीरामाचे मंदिरही उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यापुर्वीही अशा धमक्या त्यांना आल्याचं देवेंद्र तिवारी यांनी सांगितलं.

5 वर्षाच्या मुलाच्या रुपात श्रीरामाची मुर्ती : रामनगरी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथील भव्य मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम जवळपास पूर्ण झालंय. त्याचवेळी तीन प्रमुख शिल्पकारांकडून श्रीरामाच्या तीन वेगवेगळ्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, रामजन्मभूमी मंदिरात अयोध्येत तीन ठिकाणी 5 वर्षाच्या मुलाची, 4 फूट 3 इंच आकाराची, प्रभू रामाची बालस्वरुपाची उभी दगडी मूर्ती बनवली जात आहे. तीन कारागीर तीन वेगवेगळ्या ठिकाणी बनवत आहेत. या मूर्ती जवळजवळ 90 टक्के तयार झाल्या आहेत.

हेही वाचा :

  1. राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी हवी, संतांची केंद्र सरकारकडे मागणी
  2. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन

Last Updated : Jan 1, 2024, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.