ETV Bharat / bharat

माता सीतेकरिता मुस्लिम कारागीरांकडून तयार करण्यात येणार खास पैंजण, जाणून घ्या पैंजणाचे वैशिष्ट्ये - मोनू प्रजापती

Ayodhya Ram Mandir Inauguration : येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकरिता मुस्लिम कारागीर माता सीतेसाठी खास पैंजण तयार करत आहेत.

ayodhya ram mandir inauguration mata sita will wear agra mayur payal muslim craftsman getting ready know speciality
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा : आग्रा येथील मुस्लिम कारागीर तयार करताय माता सीतेसाठी खास पैंजण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 10:34 AM IST

551 ग्रॅमचे आहे आकर्षक पैंजण

आग्रा Ayodhya Ram Mandir Inauguration : सध्या सर्वांनाच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा लागलीय. 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तसंच श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणाहून शाळीग्राम निवडण्यात आले आहेत.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीच्या काशीपूर भागात पूजेची भांडी तयार केली जात आहेत. तसंच आशियातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात माता सीतेसाठी चांदीच्या मोराच्या आकारांप्रमाणं नक्षीकाम असलेलं पैंजण तयार केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे मुस्लिम कारागीर अनेक वैशिष्ट्यांसह ही पैंजण तयार करताय. तसंच ही पैंजण घेऊन सराफा व्यापारी प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्येला जाणार आहेत.

पैंजणात बसवली मोटर : यासंदर्भात अधिक माहिती देत आग्रा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष नितेश अग्रवाल म्हणाले की, 500 वर्षांनंतर आमचे लाडके रामलल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आग्रा येथील मुस्लिम कारागीर माता सीतेसाठी चांदीचे पैंजण तयार करत आहेत. या पैंजणाचे वजन 551 ग्रॅम आहे. त्यात माता सीतेची आवडती मोराची आकृती असेल. मुस्लिम कारागिरांनी 6 इंच चांदीच्या पायथ्यावरील झालरांमध्ये मोराची मोठी आकृती कोरली आहे. तसंच मोराच्या पिसात चक्र बनवण्यात आलीय. त्यात मोटर आहे. त्या मोटरनं दोन्ही चाकं फिरतील. यामुळं पैंजणाचं सौंदर्य आणखी वाढेल. तसंच या पैंजणाची किंमत 40 हजार रुपये इतकी आहे. आग्रा सराफा असोसिएशन हे पैंजण प्रभु श्रीराम आणि माता सीता यांना भेट म्हणून सुपूर्द करेल.

मुस्लीम कारागिरानं कोरली मोराची आकृती : ही पैंजण तयार करणारे मोनू प्रजापती म्हणाले की, मी 22 वर्षांपासून पैंजण बनवण्याचं काम करतो. माता सीतेसाठी पैंजण तयार करण्याचं सौभाग्य मला मिळालं. दरम्यान, कारागीर फाजील अली यांनी पैंजणावरील मोराची आकृती कोरली आहे. ते म्हणाले की, आग्रा हे गंगा-जमुना संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. हीच बाब लक्षात घेऊन माता सीतेसाठी चांदीचे पैंजण बनवण्यात आले. यानंतर प्रभू श्रीरामांसाठीही पैंजण बनवण्यात येईल. आग्र्याचे उत्कृष्ट पैंजण रामलल्ला आणि माता सीता यांच्या पायाचे सौंदर्य वाढवतील.

हेही वाचा -

  1. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा : वाराणसीमध्ये तयार करण्यात आली पुजेची विशेष भांडी
  2. वाटलं होतं आंधळी झाले, पण राम मंदिरामुळं डोळ्याचं पारणं फिटलं; 96 वर्षीय शालिनीताईंचा अनुभव
  3. राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळा : पुण्यातील गौरव देशपांडे यांच्या मुहूर्तानुसार होणार राम लल्लांची प्राण प्रतिष्ठापना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.