ETV Bharat / bharat

प्रभू रामचंद्राच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेला उरले फक्त काही दिवस, पहा मंदिराचे खास फोटो - राम मंदिर उद्घाटन

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्री राम प्रभूच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. उर्वरित काम वेगानं पूर्ण करण्यात येतय. त्या पार्श्वभूमिवर राम मंदिर ट्रस्टनं मंदिराचे काही फोटो प्रसिद्ध केलेत.

श्री राम मंदिर
श्री राम मंदिर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 9:32 AM IST

अयोध्या Ayodhya Ram Mandir : रामनगरी आयोध्येमध्ये (२२ जानेवारी) रोजी श्री राम प्रभूचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळे देशात सर्वत्र वातावरण भक्तीय झाल्याचं पाहायला मिळतय. याच दिवशी राम मंदिराचं उद्घाटनही होणार आहे. त्यामुळे सर्वच कामाची जोरदार तयारी सुरू आहे. आयोध्या नगरी आतापासूनच सजली आहे. त्यात आता राम मंदिर ट्रस्टनं मंदिराचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत.

Ram Temple
राम मंदिर

आकर्षक राम मंदिर आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे : राम भक्तांसाठी ट्रस्टनं प्रसिद्ध केलेल्या मंदिराच्या ताज्या छायाचित्रांमध्ये सिंहांच्या चित्राचाही समावेश आहे. याशिवाय राम मंदिराच्या गेटवरच रामभक्त हनुमान आणि गरुड यांच्या मूर्ती लावण्यात आल्यात. मंदिरात प्रवेश करणाऱ्या राम भक्तांना महाबली हनुमान आणि गरुड यांची परवानगी घेऊन नव्यानं बांधलेल्या मंदिरात प्रवेश मिळेल. प्रसिद्ध झालेल्या सहा छायाचित्रांवरुन मंदिराच्या भव्यतेची आणि वेगानं सुरू असलेल्या कामाची सहज कल्पना येऊ शकते.

Ram Temple
राम मंदिर

राम मंदिराचा प्रत्येक कोपरा सुसज्य : राम मंदिर १६१ फूट उंच असणार आहे. राम मंदिराची भव्यता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या मंदिराची लांबी, रुंदी आणि ऊंची या तिन्हींमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी नियोजित राम मंदिर हे ४७ हजार स्वेअर फुटांवर उभारलं जाणार होतं. मात्र, पाच घुमटांचा समावेश असलेलं हे मंदिर ५७ हजार स्वेअर फुटांवर असून, नवीन आराखड्यानुसार संपूर्ण मंदिर ३१८ खांबांवर उभं राहणार आहे. राम मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर १०६ खांब असतील. श्रीरामांचा जन्म ज्या अभिजित मुहुर्तावर झाला होता, त्याच मुहुर्तावर राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं.

Ram Temple
राम मंदिर

रामजन्मभूमी संकुलात हनुमानांची मोठी मूर्ती : 15 जानेवारीपासून मंदिरात धार्मिक विधी सुरू होणार आहेत. त्यासाठी उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. गुरुवारी दुपारी भाविकांनी अयोध्येच्या रामजन्मभूमी संकुलात हनुमानांची मोठी मूर्ती स्थापित केली. ही भव्य मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं मंदिराच्या गेटवर ठेवण्यात आली होती. याशिवाय सिंह गेटवर दगडी सिंहाचा पुतळाही बसवण्यात आला. मुख्य गेटवरच हनुमान आणि गरुड यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाबाबत रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Ram Temple
राम मंदिर
Ram Temple
राम मंदिर

हेही वाचा :

  1. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील भाविकांसाठी विनामूल्य औषधांचे ट्रक झाले रवाना
  2. अयोध्या निमंत्रणाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने दिलं 'हे' उत्तर, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.