इंदौर - मध्यप्रदेशमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. या व्हेरिएंटने येथील 7 जवान हे बाधित झाले आहेत. सप्टेंबरमध्ये जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तपासणीसाठी त्यांचे नमुने पाठवले होते. त्याचा रिपोर्ट आता प्राप्त झाला आहे.
- मध्यप्रदेशमध्ये कोरोनाचा नवा AY-4 व्हेरिएंट -
मध्यप्रदेशमध्ये 7 जणांना कोरोनाच्या नव्या AY-4 व्हेरिएंट (New Covid-19 variant AY-4)ची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हे सर्व जण कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी त्यांचे नमुने हे जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. नुकताच त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्या नमून्यामध्ये नवीन कोरोनाचा व्हेरिएंट आढळला आहे.
- 24 सप्टेंबरला आढळले होते 30 सैनिक पॉझिटिव्ह
इंदौर येथील महू आर्मी वॉर कॉलेजचे विद्यार्थी हे पुणे येथील ट्रेनिंग संपल्यावर वापस आले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने त्यांची छावनीमध्ये 24 सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली होती. यावेळी 115 सैनिकांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान 23 सैनिक 6 अधिकारीही कोरोनाबाधित आढळले होते. रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. यापैकी काही सैनिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतलेले आहेत.
- नव्या व्हेरिएंटचे दुष्परिणाम हा संशोधनाचा विषय -
बाधित रुग्णांचे नमुने हे जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 7 जणांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट AY-4 आढळला आहे अशी माहिती ही राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण केंद्राने दिलेली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सध्यातरी हा संशोधनाचा विषय आहे की नवा व्हेरिएंट हा रुग्णांसाठी किती घातक आहे. तपासणी दरम्यान कळेल की रुग्णांमध्ये कश्याप्रकारे बदल अनुभवले गेले आहेत.' हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट यापुर्वी महाराष्ट्रातही सापडला होता.
हेही वाचा - हिमाचलमधील हिमवृष्टीत मुंबईच्या तिघांचा मृत्यू!