कॅलिफोर्निया (यूएस): मराठमोळ्या अविनाश साबळेने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी 13:25.65 वाजता उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच श्रेणीत या पराक्रमासाठी नवीन रेकॉर्ड वर आपले नाव कोरले. गेल्या 30 वर्षांपासून, 1992 मध्ये 13:29.70 च्या वेगाने हा विक्रम बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता. साबळे ने सॅन जुआन मीटमधील त्याच्या शर्यतीत केवळ 12 वे स्थान मिळवले असले तरी आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तो यूएसएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. साबळे यापूर्वी कोझिकोड येथील फेडरेशन कप सीनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5000 मीटर धावला होता जिथे त्याने हे अंतर 13.39.43 या वेळेसह पूर्ण केले होते.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा या गावचा रहिवासी आहे. अविनाश लिम्पिकसाठी तयारी करत आहे. त्याला राज्य सरकारने ऑलिंपिकच्या पूर्व तयारीसाठी 50 लाख रुपये दिले आहेत. अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे. त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकलेली आहेत. मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पी.एम. मुनोत ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी 12 वी चे शिक्षण पूर्ण केले. या दोन वर्षात त्याने प्रा.जमीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीमुळे आर्मीत प्रवेश केला. सध्या अविनाश अडथळयांच्या शर्यतीचा सराव करत आहे.
-
Avinash Sable breaks 30-year-old 5000m national record in US
— ANI Digital (@ani_digital) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/e0FzGVvQHc#AvinashSable #Athletics #SoundRunningTrackMeet pic.twitter.com/le340NttcE
">Avinash Sable breaks 30-year-old 5000m national record in US
— ANI Digital (@ani_digital) May 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/e0FzGVvQHc#AvinashSable #Athletics #SoundRunningTrackMeet pic.twitter.com/le340NttcEAvinash Sable breaks 30-year-old 5000m national record in US
— ANI Digital (@ani_digital) May 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/e0FzGVvQHc#AvinashSable #Athletics #SoundRunningTrackMeet pic.twitter.com/le340NttcE