ऑटिझम ही मानसिक व्याधी आहे. पहिल्या तीन वर्षात ऑटिझम असल्याचे कळते. या व्याधीमध्ये सामाजिक संपर्क आणि संवाद ठेवता येणे कठीण जाते. ऑटिझम झालेल्याचे वागणे सर्वसामान्यांसारखे नसते. रुग्ण हायपर अॅक्टिव असतो. त्याला कशातच रस वाटत नाही.
मुंबईतले कन्सल्टंट होमिओपॅथ, डॉ. समीर चौक्कर यांनी ऑटिझम आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. ईटीव्ही भारत सुखीभवच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
होमिओपॅथीने उपचार पद्धती अवलंबताना आपल्याला क्लिनिकल दृष्टिकोन तसेच होमिओपॅथिक वैयक्तिक दृष्टिकोन पाहणे गरजेचे आहे.
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा अभ्यास केला जातो तेव्हा अनेक प्रकार समोर येतात.
- वागणुकीत अत्यंत अस्वस्थता, आवेग
- गोंगाट, स्पर्श याबद्दल अति संवेदनशीलता
- लघवी, शौच यावर नियंत्रण नसणे, घाण खाणे, आकलन नसणे इत्यादी
ऑटिझमच्या अनेक स्थिती आणि त्यावरचे उपाय थोडक्यात –
- ज्ञानेंद्रियाबाबतची स्थिती
ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या संवेदना स्वीकारण्यास असमर्थता. म्हणजे स्पर्श, आवाज, वास, दृष्टी इत्यादींमार्फत मिळणाऱ्या सूचना स्वीकारता न येणे. मूल प्रचंड संतापी होते. पालक सांगतात की ठराविक आवाज ऐकला की मूल कान बंद करून घेते. ही लक्षणे ऑटिझममध्ये महत्त्वाची असतात. मुलाच्या अनेक लक्षणांसाठी आणि स्थितीसाठी ती जबाबदार असतात. यावर Borax, Stramonium, Asarum, Theridion, Carcinosinum, Nux vomica, Opium, China या औषधांचा उपयोग होऊ शकतो.
- गतिशील स्थिती
ऑटिझममध्ये बऱ्याच जणांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असतो. यामुळे ही मुले हायपर अॅक्टिव असतात. ते सतत आवेग दाखवतात. त्यातही दोन प्रकार आहेत. एकात आक्रमकता, विध्वंसकता आणि हिंसा असते. तर दुसरा गट आक्रमक नसतो. यावर Tarentula, Stramonium, Tuberculinum, Medorrhinum Nux vomica इत्यादी औषधे देता येतील.
जेव्हा मूल स्वत:लाच दुखापत करून घेत असेल तर Tarentula, Stramonium, Tuberculinum, Medorrhinum Nux vomica ( स्वत:ला मारणे ) , Tub, Bell ( भिंतीवर डोके आपटणे ) यांचा विचार करता येईल.
- प्रतिगामी स्थिती
यात मुलाचा मलमूत्रावर ताबा राहत नाही. मूल एकदम मंदपणे व्यवहार करू लागते. अनेकदा ऑटिझम व्यक्ती वासनांध वागतात. त्या हस्तमैथुन करतात. जननेंद्रिय चोळत बसतात. अनेकदा घाण, विष्ठाही खातात. यावर Hyoscyamus, Bufo, Baryta carbonica ही औषधे घेता येतील.
ऑटिझिममध्ये होमिओपॅथीचा कसा उपयोग होतो?
- होमिओपॅथी औषधे व्यक्तीच्या एकाच अवयवावर काम करत नाहीत. ही औषधे खोलवर जाऊन सायको – न्यूरो -एंडोक्राइनोलॉजिकल आणि सायको – इम्युनोलॉजिकल अक्षांवर परिणाम करतात. ही औषधे ऑटिस्टिक लक्षणे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका साकारतात.
- ऑटिझममध्ये ज्ञानेंद्रियांच्या सूचनांचा स्वीकार करणे कठीण होते. काही मुले गोंगाट, उजेड, स्पर्श यावर अति संवेदनशील असतात. तर काही जण मिठी मारणे, स्पर्श करणे, गुदगुल्या करणे यावर एकदम प्रतिकूल असतात. होमिओपॅथीमुळे संवेदनशीलतेची ही तीव्र स्थिती सुधारते आणि संयम वाढतो.
- होमिओपॅथीमुळे शरीराची महत्त्वाची कार्ये सुरळीत होतात. ज्ञानेंद्रियाच्या अडचणी, वागण्यातला दोष सुधारतो. या छोट्या गोळ्यांचा परिणाम चांगला होतो. त्या हायपर अॅक्टिविटी, संताप येणे, स्वत:लाच दुखापत करणे किंवा विद्धवंसक वागणुकीत सुधारणा घडवून आणतात.
- ऑटिझमसाठी डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, थेरपिस्ट आणि पालक यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. इथे प्रत्येकालाच महत्त्वाची भूमिका साकारायची आहे.
- जेव्हा मूल होमिओपॅथी औषधांना प्रतिसाद देऊ लागते तेव्हा सर्वसाधारण पातळीमध्ये हा फरक दिसून येतो. मूल शांत होते, त्याची झोप, पचन आणि एकूणच आरोग्य सुधारते.
- त्यानंतरची स्थिती म्हणजे वागण्यातली सुधारणा. हायपर अॅक्टिविटी, अस्वस्थपणा, हिंसक स्वभाव इत्यादी कमी व्हायला लागते. मूल नजरेला नजर भिडवू लागते. त्यानंतर मूल संवाद साधू शकते. शब्द उच्चारण्याची आणि दुसऱ्याने बोललेल्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याची क्षमता वाढते. अर्थात, हे सगळे होण्यास वेळ लागतो. मूल सर्वसाधारण प्रतिकार दाखवते. याचे कारण होमिओपॅथी इम्युनो – मोड्युलेटर्स म्हणून काम करते.
- हे उपचार लवकरात लवकर केले, तरच चांगले परिणाम पाहायला मिळतात. म्हणजे लक्षणे लक्षात आली की त्वरित उपचार सुरू करावा. ऑटिझम सौम्य, मध्यम की तीव्र आहे यावर सुधारणा अवलंबून असते. शिवाय ऑटिझमसोबत एपिलेप्सी, अनुवांशिक आजार असेल तर त्याचा परिणाम होतोच.
अधिक माहितीसाठी drsamirchaukkar@gmail.com इथे संपर्क करा.