ETV Bharat / bharat

August Kranti : 'ऑगस्ट क्रांती' भारताच्या स्वातंत्र्याचा शेवटचा लढा; माहित आहे का तुम्हाला 'हा' इतिहास?

भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस ( August Kranti ) म्हणून ओळखला जातो. इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्ययुद्ध भारत छोडो आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली ( Mahatma Gandhi declared Quit India ) होती. या अहिंसेच्या आंदोलनात इंग्रजांच्या निर्दयीपणामुळे सुमारे 940 लोक मरण पावले होते. त्याशिवाय 1630 जण जखमी झाले होते. मोठ्याप्रामाणात जिवीतहानी भारतीयांनी पाहिली होती. त्याचवेळी 60 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

August Kranti
ऑगस्ट क्रांती
author img

By

Published : Aug 6, 2022, 12:02 PM IST

Updated : Aug 6, 2022, 2:04 PM IST

मुंबई - भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस (August Kranti ) म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या होत्या. अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिले होते. इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्ययुद्ध भारत छोडो आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली ( Mahatma Gandhi declared Quit India ) होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते.

ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी चळवळ - दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटिशांनी भारताचा पाठिंबा मागितला होता. ज्याच्या बदल्यात भारताला स्वातंत्र्य देण्याचे वचन इंग्रजांनी दिले होते. भारताचा पाठिंबा घेऊनही इंग्रज भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते. तेव्हा महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी चळवळ सुरू ( Movement to end British rule ) केली. एकूण 79 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 रोजी ही चळवळ सुरू झाली. मुंबईतील मैदानात गांधीजींनी चळवळीची घोषणा दिली. ही चळवळ जिथून सुरू झाली ते उद्यान आज ऑगस्ट क्रांती मैदान ( August Kranti Maidan ) म्हणून ओळखले जाते.

'करो या मरो'चा नारा - या लढ्यात 'करो या मरो'चा नारा देत बापूंनी ( Karo Ya Maro ) संपूर्ण भारतातील तरुणांना इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी बोलावले होते. म्हणूनच या आंदोलनाला 'भारत छोडो आंदोलन' किंवा भारत छोडो आंदोलन म्हणतात. महात्मा गांधींच्या या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सविनय कायदेभंगाची चळवळ - 4 जुलै 1942 रोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक ठराव संमत केला की जर इंग्रजांनी आता भारत सोडला नाही, तर त्यांच्या विरोधात देशभरात सविनय कायदेभंगाची ( Civil Disobedience ) चळवळ सुरू केली जाईल. मात्र, या प्रस्तावावरूनही पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले. त्यानंतर काँग्रेस नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी पक्ष सोडला.

आंदोलनाला अनेकांचा पाठिंबा - पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद या प्रस्तावित आंदोलनाबाबत साशंक असताना, त्यांनी बापूंच्या आवाहनानुसार शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय ज्येष्ठ गांधीवादी आणि समाजवादी सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, अशोक मेहता आणि जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला. मात्र, मूस्लिम लीग, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदू महासभेने या आंदोलनाला विरोध केला.

940 नागरिकांचा नाहक मृत्यू - आंदोलन सुरू होताच काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधींना अहमदनगर किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते ( Mahatma Gandhi kept under house arrest ). यासोबतच ब्रिटिशांनी काँग्रेसला एनजीओ म्हणूनही घोषित केले होते. या अहिंसेच्या आंदोलनात इंग्रजांच्या निर्दयीपणामुळे सुमारे 940 लोक मरण पावले होते ( 940 people died in the August Revolution ). त्याशिवाय 1630 जण जखमी झाले होते. मोठ्याप्रामाणात जिवीतहानी भारतीयांनी पाहिली होती. त्याचवेळी 60 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. पण या आंदोलनाने संपूर्ण देश एकत्र केला. 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात 'छोडो भारत आंदोलन'चा ठराव मंजूर करण्यात आला.

हेही वाचा - Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

Last Updated : Aug 6, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.