वडोदरा (गुजरात) - राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अवैध वीओआयपीचा (Voice Over Internet Protocol) पर्दाफाश केला आहे. वडोदरा शहर स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) सोबत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहजाद मलेक अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वडोदरा येथील तांदलजा येथील मधुरम येथील सोसायटीत राहतो.
आणखी तिघांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू -
त्याची चौकशी केली असता आणखी तीन जणांची नावे समोर आली आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील जिनी वास्वा, हारून मजीद आणि इशाक राज यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हीओआयपी एक्सचेंजेसमुळे देशाला सुरक्षेचा धोका असतो आणि त्यामुळे महसूल तोटा देखील होतो, अशी प्रतिक्रिया एटीएस अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा - महापौरांच्या कामाची घेतली "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"ने दखल
पोस्ट पेड पीआरआय लाइनचा उपयोग करुन वडोदरा येथील वासणा परिसरात अवैध स्वरुपात वीओआयपी एक्सचेंज चालवण्यात येत आहे. या माध्यमातून इंटरनॅशनल कॉल चालवला जात आहे, अशी माहिती एटीएसला मिळाली होती. आरोपींनी भाड्याने हा परिसर घेतला होता. ते आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी संगणक, वायफाय आणि राउटर वापरुन हे सेंटर चालवत होते. भारतीय टेलिग्राफ कायद्यांतर्गत अशी देवाणघेवाण चालविणे बेकायदेशीर आहे, अशी माहिती एटीएसने दिली. याप्रकरणी, वडोदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.