ETV Bharat / bharat

Atiq Ahmed : उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमद दोषी, भावाची निर्दोष मुक्तता, सर्वोच्च न्यायालयातही झटका - २००६ उमेश पाल अपहरण प्रकरण

२००६ सालच्या उमेश पाल हत्याकांड प्रकरणात गुंड आणि राजकारणी असलेल्या अतिक अहमद यांच्यासह दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. प्रयागराज येथील एमपी एमएलए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच अतिक अहमदला सर्वोच्च न्यायालयाकडूनही मोठा झटका बसला आहे. त्याच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, आधी उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे.

Atiq Ahmed brother acquitted
माफिया अतिक अहमद दोषी
author img

By

Published : Mar 28, 2023, 1:57 PM IST

प्रयागराज (उत्तरप्रदेश)/ नवी दिल्ली : प्रयागराज येथील एमपी एमएलए न्यायालयाने मंगळवारी 2006 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात गुंड, राजकारणी अतिक अहमद आणि इतर दोघांना दोषी ठरवले. विशेष एमपी एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश चंद्र शुक्ला यांनी या प्रकरणात अहमद, वकील सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना दोषी ठरवले, असे सरकारी वकील गुलाब चंद्र अग्रहरी यांनी सांगितले. अहमदचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफसह इतर सात जणांना या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

२००७ मधील आहे घटना: 25 जानेवारी 2005 रोजी तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर, तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य उमेश पाल यांनी पोलिसांना सांगितले होते की ते हत्येचा साक्षीदार आहेत. उमेश पाल यांनी आरोप केला होता की, जेव्हा त्याने अहमदच्या दबावाखाली माघार घेण्यास नकार दिला तेव्हा 28 फेब्रुवारी 2006 रोजी त्याचे बंदुकीच्या जोरावर अपहरण करण्यात आले. त्यानंतर अहमद, त्याचा भाऊ आणि इतरांविरुद्ध 5 जुलै 2007 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयातही झटका: या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाला. अहमद आणि अश्रफ यांच्यावरही उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. उमेश पाल यांची प्रयागराज येथील त्यांच्या राहत्या घराबाहेर २४ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुसरीकडे अतिक अहमदच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिक अहमदच्या वकिलाला आपल्या तक्रारींसह उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी गँगस्टर अतिक अहमदने उत्तर प्रदेशातील तुरुंगात हलवण्यात आल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती दाखवत याचिका दाखल केली होती.

तिघांची केली होती हत्या: माफियातून राजकारणी झालेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ यांना २००५ मध्ये तत्कालीन बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश पाल यांच्या अपहरण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अटक करण्यात आली होती. अहमद आणि अशरफ यांच्यावर 2005 मध्ये राजू पाल यांच्या हत्येतील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

धुमनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा: उमेश पाल यांची पत्नी जया यांच्या तक्रारीवरून अहमद, त्याचा भाऊ अशरफ, पत्नी शाइस्ता परवीन, दोन मुले, सहकारी गुड्डू मुस्लिम आणि गुलाम आणि अन्य नऊ जणांविरुद्ध प्रयागराजच्या धुमनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य उमेश पाल यांनी या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

११ आरोपींचा समावेश: 28 फेब्रुवारी 2006 रोजी अतिक अहमदच्या दबावापुढे झुकण्यास नकार दिल्याने उमेशने आपले अपहरण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी 5 जुलै 2007 रोजी अतिक, त्याचा भाऊ अश्रफ आणि चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात 11 आरोपींचा उल्लेख आहे. आता सर्वोच्च न्यायालयात झटका बसल्याने अतिक अहमद याच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा: ऑस्ट्रेलियाचा पॅराग्लायडरने घेतले हवेत उड्डाण, नंतर अडकून पडला झाडावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.