ETV Bharat / bharat

Goa Election Result 2022 : गोवा निवडणुकीत दिग्गजांच्या सभा झालेल्या ठिकाणी भाजप काँग्रेसला यश, 'आप'ला मात्र अपयश - Priyanka Gandhi

गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Election Result 2022 ) यावेळी राष्ट्रीय नेत्यांनी प्रचारात हजेरी लावल्याने या निवडणुकीत चांगलेच रंग भरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ), आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी गोवा निवडणूक प्रचारात सभा घेतल्या. त्यांनी प्रचारसभा घेतलेल्या मतदारसंघाचे निकाल पाहता मोदींचाच करिश्मा गोव्यात चालला असेच म्हणावे लागेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 10, 2022, 7:45 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Election Result 2022 ) यावेळी राष्ट्रीय नेत्यांनी प्रचारात हजेरी लावल्याने या निवडणुकीत चांगलेच रंग भरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ), आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी गोवा निवडणूक प्रचारात सभा घेतल्या. त्यांनी प्रचारसभा घेतलेल्या मतदारसंघाचे निकाल पाहता मोदींचाच करिश्मा गोव्यात चालला असेच म्हणावे लागेल.

गोवा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारबेश तालुक्यात म्हापसा मतदारसंघात निवडणूक प्रचार सभा घेतली. याठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. जोऊसा पीटर डिसोझा ( JOSHUA PETER DE SOUZA ) हे भाजपचे उमेदवार होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोलकर ( SUDHIR RAMA KANDOLKAR ) यांचा पराभव केला.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही पणजीमध्ये निवडणूक प्रचार सभा घेतली होती. त्यांनी यावेळी गोव्याच्या मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. गोव्यात दिल्लीप्रमाणेच प्रामाणिक सरकार आणू, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या आश्वासनांचा काही उपयोग झाला नाही. पणजीमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. वाल्मीकी नाईक यांना या ठिकाणी आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतनासिओ मोन्सेरात यांनी केला.

गोव्यात काँग्रेसनेही निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांबरोबरच राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) निवडणूक प्रचारासाठी आले होते. राहुल गांधी यांनी पणजी तर प्रियांका गांधी यांनी मडगाव ( Margao ) तसेच मार्मगाव ( Mormugao ) येथे सभा घेतल्या होत्या. पणजीमध्ये काँग्रेसच्या एल्विस गोम्स यांचा पराभव झाला. तर प्रियांका गांधी यांनी प्रचारसभा घेतलेल्या मतदारसंघात दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत निवडून आले. तर मार्मगावमध्ये काँग्रेसचेच संकल्प आमोनकर निवडून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.