नवी दिल्ली - देशातील कोरोना महामारीची समस्या हाताळणीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर टीका केली आहे. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य मंत्रालयाचा सुस्तावलेपणा आणि चुकीची कृती पाहून आश्चर्यचकित झाल्याचे आयएमएने म्हटले आहे.
एकत्रित जनजागृती आणि त्यासाठी पावले उचलण्याची आयएमएसह इतर प्रोफेशनल्सकडून आरोग्य मंत्रालयाला विनंती करण्यात आली होती. मात्र, ही विनंती कचऱ्यात ठेवण्यात आली. प्रत्यक्ष जमिनी स्थिती न पाहता निर्णय घेण्यात आल्याचे आयएमएने म्हटले आहे.
हेही वाचा-विशेष : कोरोना लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर ३५ हजार कोटी निधीपैकी खूपच कमी खर्च
काय म्हटले आहे आयएमएने ?
- नियोजित आणि पूर्णपणे देशात लॉकडाऊन करावे, असा आयएमएने आग्रह केला आहे. फक्त थोड्या नव्हे तर संपूर्ण देशात १० ते १५ दिवसांत लॉकडाऊन करावे, अशी मागणीही आयएमएने केली आहे.
- संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले तर आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा या साधनांसह मनुष्यबळाने पूर्ववत आणि पुनरुज्जीवत होणे शक्य होईल.
- लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या संसर्गाची चेन तुटेल, असेही आयएएमने म्हटले आहे.
- रोज ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळत असतानाही केंद्र सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यास नकार दिला आहे. तर रोज सुमारे ४० टक्के गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. निवडक ठिकाणीच करण्यात आलेल्या नाईट कर्फ्युमुळे काहीच चांगले नाही. अर्थव्यवस्थेपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे, याकडे आयएमएने केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
- देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यानेही आयएमएने केंद्र सरकारवर टीका केली आहे. रोज ऑक्सिजनचे संकट भेडसावत असताना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. जरी ऑक्सिजनचे चांगले उत्पादन होत असले तरी वितरण पूर्णपणे होत नाही.
- आरोग्य प्रशासनासाठी इंडियन मेडिकल सर्व्हिस सुरू करावी, अशी मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. इंडियन मेडिकल सर्व्हिससाठी नवीन मंत्रालय सुरू करण्याची मागणीही आयएमएने केली आहे.
हेही वाचा-सीमा शुल्क प्रक्रियेच्या दोन दिवस अडकले ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर; निधी गोळा करून केली होती आयात
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख १ हजार ७८ नवीन रुग्ण आढळले आहेत.