ETV Bharat / bharat

राजस्थान : हैदराबादपाठोपाठ जयपूरमधील आशियाई सिंहाला कोरोनाचा संसर्ग - Cellular and Molecular Biology

प्राणीसंग्रहालयातील १३ प्राण्यांचे चाचणी अहवाल मिळाले आहेत. त्यामध्ये काही प्राण्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आशियाई सिंहाला कोरोनाचा संसर्ग
आशियाई सिंहाला कोरोनाचा संसर्ग
author img

By

Published : May 13, 2021, 9:14 PM IST

जयपूर - हैदराबादमधील नेहरू प्राणीसंग्रहालयातील ८ सिंहांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर जयपूरमध्ये सिंह कोरोनाबाधित आढळला आहे. जयमपूरमध्ये सिंहाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आयव्हीआरआय) अधिकाऱ्याने सांगितले. त्रिपूर असे कोरोनाचा संसर्ग झालेल्या सिंहाचे नाव आहे.

त्रिपूर या सिंहाला सार्स-कोव्ह-२ या विषाणुची लागण झाली आहे. प्राणीसंग्रहालयातील पँथर, पांढरा वाघ आणि सिंहिणीचे नमुनेही कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. या चाचणीचे निष्कर्ष आले नसल्याचे आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक के. पी. सिंह यांनी सांगितले. त्यामुळे या प्राण्यांचे पुन्हा नमुने घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्राणीसंग्रहालयातील १३ प्राण्यांचे चाचणी अहवाल मिळाले आहेत. त्यामध्ये काही प्राण्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आशियाई सिंहाला कोरोनाचा संसर्ग

हेही वाचा-उत्तराखंड : उशीराने उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ

माणसांमधून प्राण्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता

कोरोनाची सौम्यलक्षणे असलेल्या माणसांमधून प्राण्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक के. पी. सिंह यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सीएसआयआर- सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी संस्थेने केलेल्या कोरोना चाचणीमध्ये हैदराबादमधील ८ सिंहांना कोरोना झाल्याचे ४ मे रोजी निदान झाले होते. आजपर्यंतच्या संशोधनाच्या माहितीनुसार, कोरोना हा केवळ मानवांमधून मानवामध्ये पसरतो.

हेही वाचा-लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब; राहुल गांधींची खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.