ETV Bharat / bharat

IND vs PAK Asia Cup 2022 पाकिस्तानला विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाच्या या पाच पांडवाचा करावा लागणार सामना

आशिया चषक 2022 Asia Cup 2022 साठी माजी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलच्या टीम इंडियात पुनरागमन झाल्याने टीम इंडिया चांगलीच मजबूत झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान IND vs PAK संघात दुबईत सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाला हार्दिक पांड्याबरोबरच टीम इंडियातील प्रमुख पाच पांडवाचे आव्हान असणार आहे.

IND vs PAK
IND vs PAK
author img

By

Published : Aug 28, 2022, 2:20 PM IST

नवी दिल्ली आशिया चषक 2022 Asia Cup 2022 ची सुरुवात शनिवार पासून श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली आहे. आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा India vs Pakistan Cricket Match पहिला सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्यासाठी उत्सुक आहेत. गतवर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी भारताच्या पाच पांडवांना सामोर जावे लागेल. त्यामुळे कोण आहेत टीम इंडियाचे पांच पांडव घ्या जाणून.

आशिया चषक 2022 साठी माजी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलच्या टीम इंडियात पुनरागमन झाल्याने टीम इंडिया चांगलीच मजबूत झाली आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, टीम इंडियाचे पाच पांडव कोण आहेत, जे पाक संघासाठी हार्दिक पांड्या Hardik Pandya बरोबरच कर्दनकाळ ठरु शकतात. टीम इंडियाच्या ज्या पाच पांडवांबद्दल बोलले जात आहे, ते दुसरे कोणी नसून टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज आहेत. टीम इंडिया, ज्या पाच दिग्गज फलंदाजांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाणार आहे. पाकिस्तानचा संघला त्या खेळाडूंची धास्ती आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते पाच खेळाडू.

1. केएल राहुल Vice Captain KL Rahul

टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल हा टी-20 च्या दिग्गज खेळाडूंपैकी एक मानला जातो. आशिया कप 2022 साठी केएल राहुल परतला आहे. आयपीएल 2022 IPL 2022 मध्ये केएल राहुलची बॅट जबरदस्त बोलली होती. आयपीएल 2022 नंतर केएल राहुल दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला होता. अलीकडेच केएल राहुल झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात परतला आहे. आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियात सलामीला फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. केएल राहुलच्या आयपीएल 2022 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, आयपीएलच्या 15 सामन्यांमध्ये केएल राहुलच्या बॅटमधून 616 धावा झाल्या. यादरम्यान केएल राहुलच्या बॅटने 4 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत केएल राहुलपासून पाकिस्तान संघला सावध राहावे लागेल.

2. रोहित शर्मा Captain Rohit Sharma

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. रोहित शर्मा २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आपल्या लयीत आला तर पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही. टी-20 मध्ये रोहित शर्माच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या बॅटने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 132 सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3487 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी गोलंदाज रोहित शर्मापासून सावध राहतील.

3. विराट कोहली Former captain Virat Kohli

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली रन मशीन म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानी संघाला विराट कोहलीचा नेहमीच धाक असतो. कारण विराट कोहलीची बॅट पाकिस्तानविरुद्ध जोरदार बोलते. पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 99 सामन्यांच्या 91 डावांमध्ये 3308 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटने 30 अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीसोबत पाकिस्तानचा संघही नक्कीच सावध असेल.

4. सूर्यकुमार यादव Star batsman Suryakumar Yadav

टीम इंडियामध्ये आशिया कप 2022 साठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवचाही समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव हा टी-20 चा स्पेशालिस्ट फलंदाज मानला जातो. आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवची बॅट जबरदस्त बोलते. अशा स्थितीत पाकिस्तानविरुद्धही सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करताना दिसणे अपेक्षित आहे. सूर्यकुमार यादवच्या टी-20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीबद्दल सांगायचे तर, सूर्यकुमार यादवने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 21 डावांमध्ये 672 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. तसेत तो सद्या आयसीसी टी-20 क्रमवारीत बाबर आझमनंतर दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे पाकिस्तान संघही सूर्यकुमार यादव पासून सावधान असेल.

5. ऋषभ पंत Wicketkeeper batsman Rishabh Pant

यष्टीरक्षक आणि टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक, टी-20 मध्ये देखील जबरदस्त खेळाडू आहे. ऋषभ पंत त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. पाकिस्तान संघही ऋषभ पंतपासून पूर्णपणे सतर्क असेल. जेव्हा जेव्हा ऋषभ पंतची बॅट बोलते तेव्हा गोलंदाज हताश झालेले दिसून येतात. ऋषभ पंतच्या टी-20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीवर नजर टाकल्यास 54 सामन्यांच्या 48 डावांमध्ये 883 धावा केल्या आहेत. यादरम्यान ऋषभ पंतच्या बॅटने 3 अर्धशतके झळकावली आहेत. पाकिस्तान संघही ऋषभ पंतपासून सावध असेल.

हेही वाचा - Asia Cup 2022 IND vs PAK भारत-पाक आज महामुकाबला, सामन्याबद्धल जाणून घ्या सर्वकाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.