नवी दिल्ली - काँग्रेसचे नेता अश्वनी कुमार यांनी काँग्रेस पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा ( Congress leader Ashwani Kumar resigns) राजीनामा दिला आहे. यानंतर ईटीव्ही भारतशी विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत टीका केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार ( Ashwani Kumar Exclusive interview ) म्हणाले, की काँग्रेसला त्यांची गरज नाही. काँग्रेसचा राजीनामा देणे हे खूप त्रासदायक आहे. माझे खांदे काँग्रेसचे ओझे सांभाळू शकत नाही. आत्मसम्मान आणि अस्थिता यांचा विचार करून काँग्रेसचा राजीनामा देण्याचा विचार केला ( Ashwani Kumar slammed congress leadership ) आहे. त्यावर काँग्रेसने अश्विनी कुमार यांच्यामध्ये काँग्रेसच्या विचारधारेबाबत समर्पण वृत्तीचा अभाव होता, अशी टीका केली आहे.
हेही वाचा-Sanjay Raut on BJP : सरकार पाडण्यासाठी भाजपने मदत मागितली होती, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
मंगळवारी काँग्रेसमधून अश्विनी कुमार यांनी राजीनामा ( Ashwani Kumar Resignation ) दिल्यानंतर काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की काँग्रेस आनंदाने सोडली नाही. काँग्रेसच्या अंतर्गत समस्येबाबत एखाद्या व्यक्तीवर टीका करू इच्छित नाही. 46 वर्षांपासून काँग्रेससोबत असलेल्या प्रवासाला पूर्ण विराम देत नवीन यात्रा सुरू करणार आहे.
काँग्रेसमध्ये नेतृवाचा अभाव
पंजाब विधानसभा निवडणूक 2022 आणि देशातील राजकीय संदर्भात अश्विनी कुमार म्हणाले, की तत्वांच्या लढाईबाबत काँग्रेस असमर्थ आहे. केवळ मोठ्या आवाजात बोललल्याने आणि एका व्यक्तीवर आरोप केल्याने ही लढाई जिंकता येणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वामुळे वेळेचा नाश होत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सुर्य एकटाच असतो, तो आपल्या मार्गावर चालत राहतो. आपणही मार्ग निवडला आहे, असे अश्विनी कुमार यांनी सांगितले.
राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून अश्विनी कुमार यांच्यावर टीका-
काँग्रेसमधील 23 नेत्यांशी संबंधित आणि पंजाबमधून निवडून गेलेले खासदार मनीष तिवारींच्या आरोपाला अश्विनी कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 23 काँग्रेस नेते बोलू शकतात. पण त्यावर टिप्पणी करणार नसल्याचे अश्विनी कुमार यांनी सांगितले. काँग्रेसच्या विचारधारेबाबत अश्विनी कुमार यांची समर्पणवृत्ती नव्हती, असे काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ म्हणाले आहे. कोणी पक्ष सोडला तर वाईट वाटते. आमची एक वैचारिक लढाई आहे. ज्यांच्या वैचारिक कटिबद्धता असते, ते पक्ष सोडून जातात.