हैदराबाद : Babri Masjid राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसं देशात धार्मिक तसाच राजकारणही वाढत आहे. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी समाजातील तरुणांना भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्राकडून सुरू असलेल्या कारवायांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. ते हैदराबादमधील भवानी नगर येथे सोमवार (दि. 1 जानेवरी) रोजी मदरसा-ए-अरेबिया अन्वर-उल-उलूम या आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
एकजूट राहण्याची गरज आहे : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन म्हणाले, अनेक वर्षांनंतर आपण या ठिकाणी पोहचलो आहोत. त्यामुळं आपल्याला एकजूट राहावं लागेल. आजचे तरुण पुढे म्हतारे होतील. त्यांनी आपली पुढची दिशा लक्षात घेऊन आपल्या कुटुंबाला, शहराला कसे ठेवायचे आहे, कशी मदत करता येईल याचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहनही ओवैसी यांनी उपस्थितांना केले आहे. तसेच, एकजूट ही एक ताकद आहे. तो एक आशीर्वादही आहे.
काय होता वाद : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अयोध्या वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. कोर्टाने शिया वक्फ बोर्डाला आदेश दिले. निर्मोही आखाड्याची याचिका फेटाळली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एकमतानं 5-0 ने रामलल्लाच्या बाजूने निकाल घोषित केला. वादग्रस्त जागा मंदिराची जागा असल्याचा निर्णय दिला. या निर्णयांतर्गत वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी मानून मशिदीसाठी अयोध्येतील ५ एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला देण्यात आले होते. आता तेथे भव्य श्री राम मंदिर बांधण्यात येत आहे.
अयोध्येला जाणारी मुस्लिम मुलगी : एकीकडं राम मंदिर उभारणीबाबत बोलत असताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडं मुंबईतील एक मुस्लिम तरुणी पायी अयोध्येला निघालीय. या तरुणीची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. मुंबई ते अयोध्या पदयात्रा असं लिहिलेला फलक त्यावर भगवा झेंडा फडकवत एक मुस्लिम मुलगी आयोध्येला निघाली. मी सनातनी मुस्लिम असल्याचं सांगत तिनं मुंबई ते अयोध्या प्रवास सुरू केला. अयोध्येला निघालेल्या शबनम शेख हिनं सांगितलं की, "रामाच्याच कृपेनं ध्येय साध्य होईल."
हेही वाचा :