चेन्नई (तामिळनाडू) - तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे खासदार ए राजा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात, तोपर्यंत तुम्हाला अस्पृश्य समजले जाईल, असे वादग्रस्त विधान ए राजा यांनी केले आहे. (A Raja statement) राजा यांचा या विधानाचा एक व्हिडिओ तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी ट्वीट केला आहे.
सुप्रीम कोर्टाबाबतही ए राजा यांचे वादग्रस्त विधान - अन्नामलाई यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. तसेच ए राजा यांनी केलेले विधान खेदजनक असल्याचे म्हटले आहे. याआधीदेखील ए राजा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. (As long as you are a Hindu) त्यानंतर आता पुन्हा त्यांनी जातीयवादी विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. दरम्यान, एवढेच नव्हे तर, सुप्रीम कोर्टाबाबतदेखील ए राजा यांनी वादग्रस्त विधान करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात ते म्हणतात की, जर तुम्ही ख्रिश्चन, मुस्लिम किंवा पारशी नसाल, तर तुम्ही हिंदू आहात, असे सुप्रीम कोर्ट म्हणते. मात्र, असा काही प्रकार तुम्ही इतर देशांमध्ये पाहिला आहे का? असा प्रश्न ए राजा यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणालेत ए राजा? - शेअर केलेला व्हिडिओ तामिळ भाषेतील असून, याखाली इंग्रजी कॅप्शन देण्यात आले आहे. त्यानुसार वर्णव्यवस्थेतली सर्वात खालची जात असलेल्या शुद्र जातीतील मुले ही वेश्यांची मुले आहेत. (A Raja statement On Hindu) जोपर्यंत ही मुले हिंदू धर्माचे पाईक आहेत तोपर्यंत ते शुद्रच राहतील असे ए राजा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात, तोपर्यंत तुम्ही शुद्रच राहाल. तोवर तुम्ही दलितच आहात. तोवर तुम्ही अस्पृश्यच राहणार असे विधान ए राजा या व्हिडिओमध्ये करताना दिसून येत आहेत.