हैदराबाद - मुंबई उच्च न्यायालयाने जामिन दिल्यानंतर क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर ट्विटवर #AryanBailTruth, #AryanBailTruth आणि #Mannat ट्रेण्ड सुरू आहे.
आर्यन खानच्या सुटकेनंतर शाहरुख खानचे चाहते ट्विटरवर आनंद व्यक्त करत आहेत. शाहरुख खानच्या निवासस्थानी मन्नतवर जल्लोषाचे वातावरण आहे. सिनेमा दिग्दर्शक व निर्माता करण जौहर, अभिनेता संजय कपूर, अभिनेत्रा मलाईका अरोरा यांनी आर्यन खानला समर्थन दिले आहे. करण जौहरने शाहरुख खानचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. शाहरुख आणि करणची मैत्री ही जगजाहीर आहे. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्रित काम केले आहे.
हेही वाचा-Aryan Khan Released : अखेर 26 दिवसांनंंतर आर्यन खान ऑर्थररोड तुरुंगातून बाहेर
शाहरुख खानची बिझनेस पार्टनर आणि मैत्रीण असलेली अभिनेत्री जुही चावलाने शुक्रवारी आर्यन खानसाठी जामिनदार राहिली आहे. त्यांनी वकील सतीश मानशिंदेबरोबर मिळून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आर्यन खानला मुंबईमधील ऑर्थर तुरुंगातून आणण्यासाठी एसयूव्ही वाहन पाठविण्यात आले होते. शाहरुख खानचे निवासस्थान असलेल्या मन्नत बाहेर आर्यन खानचे स्वागत करण्यासाठी अनेक चाहते जमले होते.
आर्यनच्या स्वागतासाठी 'मन्नत'वर रोषणाई -
आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' लायटिंगने सजवण्यात आला आहे. काल शाहरुख आर्यनला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेला रवाना होणार होता. शाहरुख येणार म्हणून त्याला आणि त्याच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑर्थर रोड जेलबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आज गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ऑर्थर रोड जेलबाहेर तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा-यास्मिन वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केली तक्रार
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरंगात अटकेत होता. ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली असून तो 'मन्नत'कडे रवाना झाला आहे. दरम्यान, काल आर्यन खानची जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आर्यनला कालची रात्र तरुंगात काढावी लागली होती.