मुंबई- एनसीबीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी बजावण्यात आली आहे. या दरम्यान एनसीबी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्याची चौकशी करत आहे. त्याने नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे, की मला वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला भेटायचे असेल तर पूजा नावाच्या सेक्रेटरीकडे अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतरच वडील भेटतात.
एनसीबीच्या सुत्रांनी सांगितले आहे, की चौकशी सुरु असताना आर्यन खान याने ही माहिती दिली आहे. शाहरुख सध्या तीन चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्याचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पठाण काही महिन्यांमध्ये रिलिज होणार आहे. त्यासाठी त्याला अनेक तास मेकअप करुन राहावे लागते. पठाण या चित्रपटात व्यस्त असल्याने शाहरुख कुणालाच सहसा भेटत नाही. एवढेच नव्हे तर आर्यनलाही भेटायचे असेल तर आधी पूजा नावाच्या सेक्रेटरीशी भेटून अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतरच बाप आणि मुलाची भेट होते.
आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
ड्रग्स पार्टी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी त्या सर्वांना काला किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले होते. इथे झालेल्या सुनावणीनंतर NCB ला आता या तिघांची कोठडी मिळाली आहे. एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे किल्ला न्यायालयात दाखल झाले आहेत. मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत आठ जणांना अटक केली होती. यापैकी ३ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घरचा डबा नाकारला
कॉर्डींया द क्रूझच्या ड्रग्स पार्टी प्रकरणी न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत सुनावली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात आर्यन खानला कोर्टाच्या बाहेर अरबाज मर्चंटचे वडील भेटले. त्यांनी आर्यनला 'तुला घरचं जेवण आणून देऊ का?' असा प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर दिले आहे.