ETV Bharat / bharat

INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या मुंबई बैठकीतून केजरीवाल फारकत घेण्याची शक्यता, कॉंग्रेससोबत वाद नडणार - विरोधी पक्षांची मुंबई बैठक

INDIA आघाडीच्या तिसर्‍या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमधील वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. दिल्लीत एकट्याने निवडणूक लढण्याच्या काँग्रेसच्या वक्तव्यामुळे आप नाराज आहे. पक्षाने आता मुंबईतील विरोधी पक्षांच्या बैठकीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.

AAP Congress
आप काँग्रेस
author img

By

Published : Aug 16, 2023, 9:29 PM IST

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र याआधीच विरोधकांच्या ऐक्यामध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांची बुधवारी पक्षाच्या हायकमांडसोबत बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस दिल्लीतील सातही जागांवर एकट्याने लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आम आदमी पार्टी (आप) भडकली आहे. त्यांनी आता मुंबईच्या सभेपासून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत.

..तर 'इंडिया' आघाडीला काहीच अर्थ नाही : दिल्लीत एकत्र निवडणूक लढवली नाही तर 'इंडिया' आघाडीला काही अर्थ नाही, असे आपचे म्हणणे आहे. 'आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. पण काँग्रेसने असा निर्णय घेतल्यावर आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सामील होण्यात काहीच अर्थ नाही', असे पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या.

दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते निर्णय घेतील : 'बैठकीनंतर विधाने करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. हा निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेणार आहे', असे आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले. 'बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. शीला दीक्षित यांचे कार्य दिल्लीतील जनतेला आजही आठवते. २०२४ मध्येही काँग्रेस चांगली कामगिरी करेल आणि २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली असेल, असे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी बैठकीनंतर म्हणाले.

दुसऱ्या बैठकीतही 'आप'च्या सहभागाबद्दल शंका होती : विरोधी पक्षांची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीपूर्वी देखील आम आदमी पक्षाच्या सहभागाबद्दल शंका होती. कारण तेव्हा काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाला पाठिंबा देण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. बैठकीच्या अगदी आधी, जेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्राच्या अध्यादेशाविरुद्ध राज्यसभेत 'आप'ला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, तेव्हा 'आप'ने बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले होते.

हेही वाचा :

  1. BJP Holds Crucial Meeting : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकीचा घेणार आढावा
  2. Cong AAP Meeting In Delhi : 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीपूर्वीच आज काँग्रेस-आपमध्ये बैठक; लोकसभेच्या जागा वाटपाचा होणार निर्णय?
  3. Adhir Ranjan Chowdhury : पंतप्रधानांना 'इंडिया' शब्द आवडत नाही, निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला - अधीर रंजन चौधरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.