ETV Bharat / bharat

CBI Summons to CM Kejriwal : दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांची सीबीआयकडून चौकशी सुरू

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयसमोर हजर झाले आहेत. याआधी शनिवारी आप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या 'आप'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CM Kejriwal
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Apr 16, 2023, 9:51 AM IST

Updated : Apr 16, 2023, 3:53 PM IST

नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात सीबीआयने समन्स बजावलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही तासांनंतर अधिकाऱ्यांसमोर हजर होणार आहेत. सीबीआयने त्यांना नोटीस बजावली असून रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते आपल्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी जमणार आहेत, त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील दिल्लीत तळ ठोकून आहेत. ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी येथे पोहोचतील आणि त्यांच्यासोबत सीबीआय मुख्यालयात जातील. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल जेव्हा सीबीआय मुख्यालयाकडे रवाना होतील तेव्हा त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व खासदार, दिल्ली सरकारचे कॅबिनेट मंत्री, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, आतिशी, राजकुमार आनंद, इमाम हुसैन आणि गोपाल राय असतील.

  • #WATCH | Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal leaves for CBI office after he was summoned by the agency in connection with liquor scam case. pic.twitter.com/62W3losVFz

    — ANI (@ANI) April 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जगात कोणीही प्रामाणिक नाही : सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी प्रकरणात चौकशीसाठी नोटीस दिल्यापासून आम आदमी पक्ष भाजपवर आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते संजय सिंह, सौरभ भारद्वाज, आतिशी आणि राघव चढ्ढा यांनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा एकही कार्यकर्ता घाबरलेला नाही किंवा झुकणार नाही, असे सांगितले आहे. शनिवारी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही प्रसारमाध्यमांना संबोधित करत आपली बाजू मांडली. केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात कोणीही प्रामाणिक नाही, असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सीबीआय आणि ईडी जवळपास वर्षभरापासून दारू घोटाळ्याची चौकशी करत आहेत. आतापर्यंत पैसे आणि पुरावे मिळायला हवे होते, पण ते काही मिळाले नाही. 100 कोटी रुपयांची लाच घेतली आणि दिली गेली, जी गोवा निवडणुकीत वापरली गेली, असा त्यांचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी गोव्यात जाऊन सर्व तपास केला, मात्र तेथेही काहीही सापडले नाही, मग शंभर कोटी रुपये कुठे गेले? सीएम केजरीवाल म्हणाले, जिथे घोटाळा झाला नाही, तिथे लोकांना धमकावून स्टेटमेंट लिहून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम आदमी पक्ष हा देशातील जनतेसाठी एक नवी आशा बनून उदयास आला आहे. पंतप्रधान आणि भाजपला हे पचनी पडत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  • #WATCH | Some anti-national forces don’t want India to develop. I want to tell these forces that the country will continue to progress: Delhi CM and AAP leader Arvind Kejriwal

    Arvind Kejriwal has been summoned by CBI in connection with the liquor scam case. pic.twitter.com/D49pFh5hld

केजरीवाल हे सर्वात भ्रष्ट सरकारचे प्रमुख : दुसरीकडे भाजप नेतेही रविवारी राजघाट येथील बापूंच्या समाधीवर केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. शनिवारी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना महात्मा गांधींशी केली, जी भाजप नेत्यांनी मूर्खपणाची असल्याचे म्हटले. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी आणि इतर नेते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करतील आणि आंदोलन करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणतात की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावले आहे हे आश्चर्यकारक नाही. केजरीवाल हे या दशकातील सर्वात भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही चूक केली नसेल, तर त्यांच्या तपासाला घाबरण्याचे कारण नाही. ते म्हणाले की, मनीष सिसोदिया दारू घोटाळ्यात जवळपास 50 दिवस तुरुंगात आहेत. अनेक न्यायालयीन सुनावणीत न्यायालयाने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. घोटाळ्यात नाही तर तुरुंगात का आहेत?

हेही वाचा : Vajramooth Sabha in Nagpur : नागपुरमध्ये आज महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा, विदर्भातील सभेमागे काय आहे राजकीय गणित?

Last Updated : Apr 16, 2023, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.