ETV Bharat / bharat

Arrest case of Tajinder Bagga : दिल्ली पोलिसांसह पंजाब पोलिसांनी उच्च न्यायालयात 'ही' मांडली बाजू - अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन

सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पंजाब आणि दिल्ली पोलिसांना या प्रकरणी आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास ( Delhi and Punjab Police in court ) सांगितले आहे. उद्या सकाळी या प्रकरणावर पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन ( ASG Satyapal Jain ) यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडली

BJP leader Tejendra Pal Bagga
भाजपचे नेते तेजेंद्र पाल बग्गा
author img

By

Published : May 6, 2022, 8:25 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीतील भाजपचे नेते तेजेंद्र पाल बग्गा ( arrest of BJP Tejendra Pal Bagga ) यांना पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. हरियाणा, पंजाब व दिल्ली या तिन्ही राज्यातील पोलिसात वाद ( Delhi Police vs Punjab Police ) निर्माण झाला आहे. दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांवर तेजेंद्र पाल बॅगा यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे राजकीय वादंग सुरू असतानाच दुसरीकडे पंजाब पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांकडून पंजाब पोलिसांविरोधात गुन्हा दाखल- सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पंजाब आणि दिल्ली पोलिसांना या प्रकरणी आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास ( Delhi and Punjab Police in court ) सांगितले आहे. उद्या सकाळी या प्रकरणावर पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन ( ASG Satyapal Jain ) यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडली. ते माध्यमांशी म्हणाले की, आज सकाळी जनकपुरी पोलीस ठाण्यात तेजेंद्र पाल बग्गा यांच्या वडिलांच्यावतीने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार आज सकाळी काही लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच मारहाणही केली.

पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीला नेले- तेजिंदर पाल बग्गा यांना जबरदस्तीने घेऊन गेले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा एफआयआर नोंदविला. दिल्ली पोलिसांनी तेजिंदर सिंग बग्गा यांचे अपहरण झाल्याचे न्यायालयाकडून शोध वॉरंट घेतले. आम्ही ते सर्च वॉरंट हरियाणा पोलिसांना पाठविले. हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्राजवळ त्या सर्च वॉरंटची अंमलबजावणी केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीला नेले आहे. याबाबत कोणासाठी सर्च वॉरंट काढण्यात आले, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

प्रकरणावर उद्या सुनावणी होणार - ते म्हणाले की आम्ही दिल्ली पोलिसांच्यावतीने दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी नोंदविलेली एफआयआर तसेच न्यायालयातून काढलेले सर्च वॉरंट दिले आहे. दिल्ली पोलिसांनी पंजाबमधून एकाही अधिकाऱ्याला ताब्यात घेतलेले नाही. दोन-तीन पोलीस अधिकारी त्यांच्या जनकपुरी पोलीस ठाण्यात आहेत, ते तिथे स्वत:च्या मर्जीने बसलेले आहेत. त्याबाबत काही माहिती असेल ती संध्याकाळपर्यंत आम्ही न्यायालयाला लेखी कळवू. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार असल्याचेही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एका राज्याचे पोलीस दुसर्‍या राज्यात एखाद्याला अटक करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी लागते. पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांना कोणतीही सूचना किंवा कोणतीही माहिती दिली नाही, असेही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी सांगितले.

हेही वाचा-JITO Connect 2022 : जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे - पंतप्रधान

हेही वाचा-Kashis Divyang Astha : दिव्यांग आस्थांवर 13 शस्त्रक्रियांसह 100 हाडांचे फ्रॅक्चर, जिद्दीने चालविते एनजीओ

हेही वाचा-Mussoorie Bus Accident : मसुरीला फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; 7 जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.