नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाचे वाहन शनिवारी सायंकाळी लेह जिल्ह्यातील दरीत कोसळून 9 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर देशभराती नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या सैनिकांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व केंद्रीय संरक्षण मंत्री यांनीही ट्विट करत जवानांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.
-
“Pained by mishap”: PM Modi condoles deaths of 9 army jawans in Ladakh accident
— ANI Digital (@ani_digital) August 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/i5j6QsqA0b#PMModi #LadakhAccident pic.twitter.com/fk1KIe6eir
">“Pained by mishap”: PM Modi condoles deaths of 9 army jawans in Ladakh accident
— ANI Digital (@ani_digital) August 19, 2023
Read @ANI Story | https://t.co/i5j6QsqA0b#PMModi #LadakhAccident pic.twitter.com/fk1KIe6eir“Pained by mishap”: PM Modi condoles deaths of 9 army jawans in Ladakh accident
— ANI Digital (@ani_digital) August 19, 2023
Read @ANI Story | https://t.co/i5j6QsqA0b#PMModi #LadakhAccident pic.twitter.com/fk1KIe6eir
काय आहे घटना : भारतीय सैन्यदलाचं वाहन जवानांना घेऊन लेह जिल्ह्यातील करू गॅरिसन इथून कॅरीकडं जात होतं. यावेळी लष्करी जवानांच्या वाहनाचा ताफा जाणाऱ्या रोडवर चालकाचं भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट खोल दरीत कोसळले. या घटनेत वाहनात बसलेले 10 पैकी 8 जण जागेवरच ठार झाल. तर एका जवानाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाच्यावतीनं देण्यात आली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी : जम्मू काश्मीरमधील लेह जिल्ह्यात झालेल्या लष्कराच्या वाहनाच्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना प्रकट केली आहे. सोशल माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. अपघातात जखमी झालेल्या जवानांच्या लवकर बरं होण्यासाठीही प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांनीही व्यक्त केल्या संवेदना : भारतीय सैन्यदलाच्या वाहनाला लेहमध्ये अपघात झाल्यानंतर देशभरात दु:ख व्यक्त होत आहे . त्यामुळे या जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत नागरिकांनी जवानांना आदरांजली व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांना आदरांजली वाहत त्यांच्या कार्याचं देश स्मरण करेल, असे म्हटलं आहे. तर जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांनीही जवानांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. देश या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचंही त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
हेही वाचा -