श्रीनगर - सैन्यदलाला जम्मू काश्मीरमध्ये फक्त शस्त्रानेच नाही तर मानवतेच्या नात्यानेही दहशतवाद्यांना समजावूनही सांगण्याची भूमिकाही पार पाडावी लागते. सैन्यदलातील मेजर दहशतवाद्याला शरण येण्याचे आव्हान करत असतानाचा व्हिडिओ सैन्यदलाने जारी केला आहे. शरण आल्यानंतर कोणतीही हानी पोहोचविणार नाही, याची खात्री दिल्यानंतर दहशतवादी शरण आला आहे. साहिल अहमद असे शरण आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.
सैन्यदलाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात स्पीकर घेऊन मेजर दहशवाद्याला शरण येण्याचे आवाहन केल्याचे दिसत आहे. त्यासोबत सैन्यदलातील अधिकारी व इतर सैनिक दिसत आहेत.
हेही वाचा-दहशतवादाला खतपाणी घालणारा पाक एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्येच
मेजरने काय केले आवाहन?
व्हिडिओमध्ये मेजर म्हणताना दिसत आहेत, माझे ऐक, मी मेजर शुक्ला बोलत आहे. याच्यापूर्वीही तुला विनंती केली आहे. हा शेवटचा इशारा आहे. विनंती आहे. जे समजायचे ते समज. हत्यार खाली ठेव. हात वर करून बाहेर ये. जर हत्यार खाली ठेवून हात वर करून आल्यास तुला काहीही होणार नाही, याची मी हमी देतो. तुझ्या घरातील लोकांना आणि दोस्तांना आठव. तुझ्या आई-वडिलांना आठव. जर आठवत असेल तर तुला कृपया विनंती आहे, हत्यार टाकून बाहेर ये. मी शरण म्हणून तुला घ्यायला तयार आहे. मला वाटते की तू शरण यावे. तुझ्या घरातील लोक माहित आहेत, त्यामुळे मला वाटते की तू शरण यावे. त्यांच्यावर जी संकटे कोसळतील ती तुला समजणार नाहीत. मेजर शुक्ला यांनी आवाहन केल्यानंतर दहशतवादी हा शरण आला आहे. मात्र, तो व्हिडिओमध्ये दिसत नाही.
हेही वाचा-JusticeforGeorgeFloyd : जॉर्ज फ्लॉइडला अखेर मिळाला न्याय, दोषीला 22 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा
चकमकीत दहशतवादी ठार-
सैन्यदलाने चकमकीत दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात असलेल्या हांजीपोरा गावात एका दहशतवाद्याला ठार केले. हा दहशतवादी अवंतपुरामधील संभूरा येथील रहिवाशी आहे. मुर्तुजा अहमद दर असे या ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.
हेही वाचा-शाहू महाराज जयंती: जाणून घ्या १०० वर्षांपूर्वी कशी नियंत्रणात आणली होती "प्लेग महामारी"
गावात इतर दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू-
इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) विजय कुमार म्हणाले, की हांजीपुरा येथील घरात चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. जेव्हा पोलीस घरात गेले, तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी एक दहशतवादी ठार करण्यात सैन्यदलाला यश आले. तर दुसरा दहशतवादी हा सैन्यदलाच्या आवाहनानंतर शरण आला आहे. चार दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्याने इतर दोन दहशतवाद्यांचा गावात शोध सुरू असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. अजूनही गावामध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.