ETV Bharat / bharat

Army Dog Kent : दहशतवाद्यांशी चकमकी दरम्यान सैन्याच्या श्वानाचं सर्वोच्च बलिदान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:46 PM IST

Army Dog Kent : दहशतवाद्यांशी लढताना आर्मीच्या 'केंट' या शूर श्वानानं तिच्या हँडलरचा जीव वाचवला. या दरम्यान श्वानानं आपल्या प्राणाची आहुती दिली.

Army Dog Kent
भारतीय सैन्याचा कुत्रा केंट

श्रीनगर Army Dog Kent : श्वानांची जात ही आपल्या मालकाप्रती अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखली जाते. याची प्रचिती आज जम्मू-काश्मिरमधील सैन्याच्या चकमकीदरम्यान आली. मंगळवारी संध्याकाळी राजौरी जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी भारतीय सैन्याच्या श्वान 'केंट'नं आपल्या हँडलरचं संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलं.

सैन्याच्या 'ऑपरेशन सुजलीगाला'मध्ये सर्वात पुढे होती : दहशतवाद्यांशी लढताना आर्मीच्या 'केंट' या शूर श्वानानं हँडलरचा जीव वाचवला. केंट सैन्याच्या 'ऑपरेशन सुजलीगाला'मध्ये सर्वात पुढे होती. ती दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका तुकडीचं नेतृत्व करत होती. दरम्यान, तिच्यावर प्रचंड गोळीबार झाला. तेव्हा हँडलरचं संरक्षण करत असताना केंटनं स्वतःचं जीवन अर्पण केलं. जम्मू संरक्षण पीआरओनं एका निवेदनाद्वारे ही बातमी दिली. केंट ही लॅब्राडोर जातीची श्वान होती. श्वानाचं वय ६ वर्ष होतं. केंट २१ आर्मी डॉग युनिटची मेंबर होती.

  • चकमकीत एका जवानाचा मृत्यू : जम्मू-काश्मिरमधील नारला गावात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी आणि भारतीय सैन्याचा एक जवान ठार झाला. तर दोन जवान आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाल्याचं जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितलं.

सुरक्षा कर्मचार्‍यांची शोध आणि घेराबंदी सुरू : अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीनंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी सोमवारी पत्राडा भागात शोध आणि घेराबंदी सुरू केली. दरम्यान, काही राऊंड गोळीबार करण्यात आला. यामुळे संशयित दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर आसपासच्या भागात घेराबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. संशयित दहशतवाद्यांनी काही कपडे आणि इतर वस्तू असलेली बॅग मागे सोडली. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार, तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानं तणावाची स्थिती
  2. India China Border : चीन सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या, ITBP च्या ३ बटालियन तैनात; काय साध्य होणार?
  3. Army Recruitment : खासदार केतकरांनी सैन्य भरतीच्या मुद्याला राज्यभेत घातला हात, हजारो अधिकाऱ्यांची पदे रिक्त, सरकारची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.