ETV Bharat / bharat

Actress Archana Gautam: बिग बॉस फेम अर्चना गौतमने राजकारणातून बाहेर पडण्याची केली घोषणा, म्हणाली मला आता... - अभिनेत्री अर्चना गौतम बातमी

बिग बॉस फेम, प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री अर्चना गौतमने आता राजकारण सोडत असल्याची घोषणा केली आहे. आता काही वर्षांसाठी फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे असही ती म्हणाली आहे.

Actress Archana Gautam
Actress Archana Gautam
author img

By

Published : Apr 26, 2023, 10:43 PM IST

मेरठ : बिग बॉस फेम अर्चना गौतमने आज बुधवार जाहीर केले की ती काही वर्षांसाठी फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे राजकारणापासून दूर राहणार आहे. काही दिवसांपुर्वी अर्चनाने विधानसभा निवडणूक लढवून हस्तिनापूरला द्रौपदीच्या शापापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता या अभिनेत्रीने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मायानगरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तीने ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीचे वडील गौतम बुद्ध यांनीही ईटीव्ही भारतशी संवाद साधताना आपल्या मुलीच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

मुलीकडे खूप काम आहेत : २०२२ मध्ये काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवून प्रसिद्धीझोतात आलेल्या मेरठच्या हस्तिनापूर भागातील रहिवासी असलेल्या चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आणि अभिनेत्री अर्चना गौतमने आता काही वर्षे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ती राजकारण टाळत असल्याचं अर्चनाने म्हटलं आहे. आता पूर्ण लक्ष फक्त फिल्मनगरीवर ठेवायचे आहे. अभिनेत्रीचे वडील गौतम बुद्ध म्हणाले की, बिग बॉस शोनंतर त्यांच्या मुलीकडे खूप काम आहे. ते म्हणाले की आता त्यांची मुलगी येणारा बराच काळ व्यस्त असणार आहे. बिग बॉसनंतर तीला सतत वेगवेगळे प्रोजेक्ट मिळत आहेत असही ते म्हणाले आहेत.

आता राजकारणात जाणे ही नंतरची बाब : अर्चनाच्या राजकारणापासून दूर राहण्याच्या निर्णयावर कुटुंबही खूश असल्याचे त्यांनी सांगितले. अर्चनाच्या वडिलांनी सांगितले की, तिने राजकारणात प्रवेश केला कारण तिला चित्रपटसृष्टीत स्थान मिळण्याची फार कमी संधी होती. तीला साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम मिळाले. अभिनेत्रीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे पहिले आणि शेवटचे प्राधान्य लोकांचे मनोरंजन करणे आहे. अर्चनाच्या वडिलांनी सांगितले की, आता परमात्म्याच्या आशीर्वादाने त्यांच्या मुलीला खूप काम करायचे आहे. ती तिच्या कॉमेडीने आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये काम करून लोकांच्या मनावर राज्य करेल. आता राजकारणात जाणे ही नंतरची बाब आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : Parkash Singh Badal Death : पंतप्रधान मोदींनी प्रकाश सिंग बादल यांना वाहिली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.