हैदराबाद : हैदराबादमध्ये सोमवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी आणखी एका मुलावर हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी अशाच एक घटनेत भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. या हल्यात त्या मुलाचा दूर्दैवी मृत्यू झाला होता. आता हैदराबादमधील चैतन्यपुरी भागातील मारुती नगर कॉलनीत एका चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.
मुलगा रुग्णालयात दाखल : शहरातील चैतन्यपुरी येथील मारुती नगर रोड क्रमांक 19 येथील जैन मंदिरात सोमवारी रात्री चार वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलाचा आरडाओरडा ऐकून आई-वडील आणि कॉलनीतील लोकांनी धावत येऊन कुत्र्यांना पळवून लावले. स्थानिकांनी दगड आणि लाठ्यांसह कुत्र्यांचा पाठलाग केला. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मुलाला पालकांनी उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष : कॉलनीतील भटक्या कुत्र्यांबाबत अनेकदा तक्रार करूनही पालिकेने कुठलीच कारवाई केली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. दुसऱ्या एका घटनेत कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एका वृद्धाला गंभीर दुखापत झाली होती. दुसरी घटना वीणावांका मंडळ मल्लारेड्डीपल्ली येथे घडली. गावातील येसया नावाचा व्यक्ती दुचाकीवरून जात असताना कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. येसया दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी हुजुराबाद एरिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
भटक्या कुत्र्यांची दहशत : करीमनगर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. शंकरपट्टनम मंडल केंद्रातील एससी मुलांच्या वसतिगृहात एक कुत्रा घुसला. त्याने तेथील एका विद्यार्थ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून करीमनगर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. अंबरपेट येथील एरुकुला बस्ती येथे काही कुत्र्यांनी चार वर्षाच्या मुलावर हल्ला केला. एका कुत्र्याने त्याचा पाय व दुसरा हात पकडून त्याला एका बाजूला ओढत नेले. मुलाने सुटण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र कुत्र्यांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. या हल्यात तो मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुलगा दवाखाण्यात येण्यापूर्वीच मरण पावला असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.
हेही वाचा : Boy Killed in Dogs Attack : मुलांची घ्या काळजी! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू