ETV Bharat / bharat

Cheetah Death : कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू - एका चित्त्याचा मृत्यू

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. परदेशातून आणलेल्या दोन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आता एकूण 18 चित्ते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते.

Leopard Death
Leopard Death
author img

By

Published : Apr 23, 2023, 10:54 PM IST

नवी दिल्ली : परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू झाला आहे. मरण पावलेला चित्त्याचे नाव उदय असे ठेवण्यात आले होते. त्याला दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथील राष्ट्रीय उद्यांनात आणण्यात आले होते. तत्पूर्वी, काही दिवसापूर्वी मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी चार वाजता चित्ता उदयचा मृत्यू झाला झाला आहे. त्यांची तब्येत खराब असल्याचे वनविभागाच्या पथकाला सकाळी दिसले होते. यानंतर चित्त्याचाला भूल देण्यात आली होती. त्यांच्यावर सकाळपासून वैद्यकीय केंद्रात उपचार सुरू होते, मात्र, दुपारी ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Madhya Pradesh | Another Cheetah, Uday, who was brought from South Africa, has died during treatment after falling ill at Kuno National Park. Reason for death is yet to be ascertained: MP Chief Conservator of Forest JS Chauhan pic.twitter.com/2IHPMCji2L

    — ANI (@ANI) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट : प्रेस नोटनुसार 23 एप्रिल रोजी नर चित्ता उदय सुस्त अवस्थेत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या जवळ गेल्यावर तो दचकत मान झुकवून चालत होता. आदल्या दिवशीच्या निरीक्षणात तो पूर्णपणे निरोगी होता असे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. यानंतर वन्यजीव डॉक्टरांना या बाबत माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून चित्त्याचा उदयची तपासणी केली. यादरम्यान तो आजारी असल्याचे दिसून आले. प्रेस नोटमध्ये असेही म्हटले आहे की, सकाळी 11 च्या सुमारास चित्त्याला बेशुद्ध करून उपचार करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र दुपारी चारच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

उद्या होणार शवविच्छेदन : चित्त्याला उदयला पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. त्याच्यासोबत इतर 11 चित्ते यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी कुनो येथील राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले होते. उद्या सोमवारी पशुवैद्यकीय पथक चित्ता उदयच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणार करणार असल्याची माहिती मिळते आहे. भोपाळ आणि जबलपूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना पोस्टमॉर्टमसाठी कुनो येथील राष्ट्रीय उद्यांनात पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Sex Racket Busted : मुलींचे कौमार्य तोडण्यासाठी लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.