ETV Bharat / bharat

11 Crore Rupee Donation : माणुसकीचे दर्शन! दुर्मिळ आजार असलेल्या बालकाला अज्ञात व्यक्तीकडून तब्बल 11 कोटींची मदत! - परदेशातून बालकाला 11 कोटींची मदत

दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या केरळच्या बाळाला एका अज्ञात व्यक्तीने उपचारासाठी 11 कोटी रुपयांची मदत केली आहे. हा पैसा परदेशातून क्राउडफंडिंगच्या माध्यमातून आला आहे.

11 Crore Rupee Donation to Kerala child
केरळच्या बालकाला 11 कोटींची मदत
author img

By

Published : Feb 22, 2023, 7:27 AM IST

एर्नाकुलम (केरळ) : केरळच्या एर्नाकुलम येथील एका घटनेने जगात माणुसकी अजुनही शाबूत आहे याची प्रचिती मिळाली आहे. परदेशातील एका निनावी व्यक्तीकडून केरळच्या चिमुकल्या निर्वाणला अनपेक्षितरित्या मदत प्राप्त झाली आहे. 16 महिन्यांच्या निर्वानला स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी हा दुर्मिळ आजार आहे, ज्याच्या एक वेळच्या औषधासाठी सुमारे 17.5 कोटी रुपये खर्च येतो.

मदत म्हणून 11 कोटी रुपये दिले : गेल्या काही दिवसांपासून छोट्या निर्वाणच्या आजाराच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. निर्वाणबद्दल कळल्यानंतर जगभरातील अनेकांनी त्याला मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, तब्बल 17.5 कोटी रुपयांची रक्कम जमा करणे हे त्या कुटुंबासाठी जवळपास अशक्यच होते. दरम्यान परदेशातून त्याला एक अनपेक्षित मदत आली. नाव जाहीर न करणार्‍या व्यक्तीने निर्वाणला मदत म्हणून तब्बल 11 कोटी रुपये दिले! हा पैसा परदेशातून क्राउडफंडिंगच्या माध्यमातून आला आहे. कुटुंबाला आता आणखी 80 लाख रुपये मिळाल्यास, निर्वाणच्या उपचारासाठी लागणारी एकूण रक्कम जमा होईल. उपचारासाठी एवढी मोठी रक्कम मिळाल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी हा रोग : महिनाभरापूर्वी नौदलाचे अधिकारी सारंग आणि अथिधी यांचा मुलगा निर्वाण याला स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी (SMA) टाईप 2 आजार असल्याचे निदान झाले. स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी हा एक प्रकारचा अनुवांशिक रोग आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंची ताकद परत मिळवता येत नाही आणि ती तुलनेने कमी होते. पाठीच्या कण्यातील जनुकांचा नाश हे या आजाराचे कारण आहे.

आणखी 80 लाखांची गरज : जन्मानंतर 15 महिन्यांनंतरही बाळाला पाय हलवता येत नसल्याने कुटुंबीयांनी बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. आता तो 16 महिन्यांचा आहे. बाळाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच औषध दिले तरच उपचार प्रभावी होतील, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. मात्र आठ महिन्यांत 17.5 कोटी रुपयांची रक्कम उभी करण्याची कुटुंबाची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांनी समाजाची मदत घेतली. यानंतर बाळ निर्वाणच्या खात्यावर छोट्या-मोठ्या देणग्या येऊ लागल्या. उपचारासाठी लागणारे औषध अमेरिकेतून आणावे लागत असल्याने त्यासाठी एवढी मोठी रक्कम लागते. उपचारासाठी लागणारे उर्वरित 80 लाख रुपये लवकरच मिळतील, अशी कुटुंबीयांची अपेक्षा आहे. निर्वाण बरा झाल्यानंतर मुलासाठी एवढी मोठी रक्कम देणाऱ्या देवासारख्या मदतनीसची एकदा भेट होऊ व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचा : UPI PayNow linkage: मोबाईल नंबरवरून पाठवता येणार सिंगापूरला पैसे, डिजिटल व्यवहार झाले सोपे.. भारतीय UPI शी जोडले सिंगापूरचे PayNow

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.