ETV Bharat / bharat

Anna Hazare Warning Protest : 'अजून म्हातारा झालो नाही'; अण्णा हजारे पुन्हा आक्रमक; आंदोलनाचा इशारा - अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

Anna Hazare Warning Protest : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय. 'ईआरसीपी' प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरत अण्णा हजारे आता आक्रमक झाले आहेत. तसेच रामलीला येथील आंदोलनानंतर दुसरं सर्वात मोठं आंदोलन उभारण्याचा निर्धार हजारे यांनी केलाय.

Etv Bharat
अण्णा हजारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 11:23 AM IST

अण्णा हजारे राजस्थानमध्ये

करौली (राजस्थान) : Anna Hazare Warning Protest : राजस्थानमध्ये वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात 'ईआरसीपी'चा मुद्दा (ERCP project in Rajasthan) तापलाय. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आहेत. त्याचबरोबर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare on ERCP project) यांनीही या मुद्द्यावर उघडपणे भूमिका मांडली आहे. राजस्थानमधील तोडाभीम येथे जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या अण्णा हजारे यांनी 'ईआरसीपी'ला दिरंगाई झाल्यास पूर्व राजस्थानच्या भूमीतून दुसरं मोठं आंदोलन केलं जाईल, असं स्पष्ट केलंय.

सध्या मी 86 वर्षांचा असलो तरी अजून म्हातारा झालेलो नाही. त्यामुळं सरकारनं आता पूर्व राजस्थानमधील लोकांना 'ईआरसीपी' देण्यास दिरंगाई केली, तर मोठं आंदोलन उभारण्यास मागेपुढं पाहिलं जाणार नाही - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

anna hazare in rajasthan
अण्णा हजारे राजस्थानमध्ये

'ईआरसीपी' म्हणजे काय? : राजस्थानमधील 'ईआरसीपी' (ईस्टर्न राजस्थान कालवा प्रकल्प) प्रकल्पावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक सुरू आहे. हा प्रकल्प राजस्थानमधील जवळपास 13 जिल्ह्यांसाठी आहे. या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असते. त्यामुळं हा प्रकल्प येथील नागरिकांसाठी संजीवनी मानला जातो. या मुद्द्यावर दोन्ही राजकीय पक्षांनी अनेकदा विविध विधानं केली असून, एकमेकांवर आरोपही केले आहेत. सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या विषयात आता उडी घेतली आहे.

.

मोठं आंदोलन उभारण्यात येणार : 'ईआरसीपी' पूर्व राजस्थानसाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. सरकारनं ईआरसीपी न दिल्यास पूर्व राजस्थानच्या भूमीत आणखी एक मोठं आंदोलन होईल. ईआरसीपीच्या मागणीचं मी उघडपणे समर्थन करतो. तसंच हा राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात सरकारनं दिरंगाई करू नये, अन्यथा मोठं आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिलाय. पूर्व राजस्थान कालवा प्रकल्प किसान विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष रामनिवास मीणा आणि राज्याचे मुख्य निमंत्रक रवींद्र मीणा यांच्या निमंत्रणावरून अण्णा हजारे राजस्थानमध्ये आले होते. येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ईआरसीपीच्या मागणीचं समर्थन करत सरकारला इशारा दिलाय.

anna hazare in rajasthan
अण्णा हजारे राजस्थानमध्ये

पूर्व राजस्थानात दुसरं मोठं आंदोलन होणार : सरकारनं 'ईआरसीपी'ची मागणी मान्य न केल्यास नवी दिल्लीतील रामलीला मैदानानंतर दुसरं मोठं आंदोलन पूर्व राजस्थानच्या भूमीवर होईल, असं अण्णा हजारे म्हणाले. त्यासाठी सरकारनं सज्ज राहावं, असा इशाराही त्यांनी दिलाय. पूर्व राजस्थानच्या सामान्य जनतेची पहिली गरज 'ईआरसीपी' आहे. सरकारला हे फार पूर्वीच समजायला हवं होतं, परंतु, पूर्व राजस्थानच्या या महत्त्वाच्या गरजेकडं सरकारनं अद्याप गांभीर्य दाखवलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. पूर्व राजस्थानमधील लोकांच्या जीवनाशी निगडीत हा प्रकल्प असल्याचंही अण्णा हजारे म्हणाले.

हेही वाचा -

Threat To Anna Hazare : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी, १ मे रोजी हत्या करण्याचा इशारा

Anna Hazare अण्णा हजारेंचं आंदोलन एक षडयंत्र होतं - सुषमा अंधारे

Anna Hazare Video : माॅलमध्ये वाईन विक्रिला अण्णा हजारेचा विरोध; सरकारने अंमलबजावनी केल्यास आंदोलनाचा दिला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.