ETV Bharat / bharat

Gyanvapi Shringar Gauri Case : ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नसून फुटलेले कारंजे- वकिलाचा दावा - Shivling with photo of fountain

मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी ज्ञानवापी प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला होता. या प्रकरणात सापडलेले पुरावे न्यायालयात सादर करावेत, असे वकिलांनी सांगितले होते. पण संध्याकाळी दिल्लीत बसलेले सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मोहम्मद असद हयात ( lawyer Mohammad Asad Hayat ) यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये कारंज्याच्या फोटोसह शिवलिंग मिळवण्यासंबंधीची ( Shivling with photo of fountain ) काही जुनी कागदपत्रे आणि जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले पुरावे
ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले पुरावे
author img

By

Published : May 17, 2022, 4:18 PM IST

वाराणसी- ज्ञानवापी श्रृंगार गौरी प्रकरणातील ( Gyanvapi Shringar Gauri case ) आयोगाच्या कार्यवाहीदरम्यान, सोमवारी, ज्ञानवापी मशिदीच्या आवारात वाझूसाठी बांधलेल्या तलावात शिवलिंग सापडल्याचा ( premises of Gyanvapi Mosque ) दावा चर्चेत आला. या माहितीनंतर आता मुस्लीम पक्ष याप्रकरणी उघडपणे बोलत आहे.

आज दुपारी मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी ज्ञानवापी प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला होता. या प्रकरणात सापडलेले पुरावे न्यायालयात सादर करावेत, असे वकिलांनी सांगितले होते. पण संध्याकाळी दिल्लीत बसलेले सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मोहम्मद असद हयात ( lawyer Mohammad Asad Hayat ) यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये कारंज्याच्या फोटोसह शिवलिंग मिळवण्यासंबंधीची ( Shivling with photo of fountain ) काही जुनी कागदपत्रे आणि जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नसून फुटलेले कारं

शिवलिंग नसून तुटलेल्या कारंजाचा भाग- सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली. या पोस्टबाबत अंजुमन इंतजा मियाँ मस्जिद कमिटीचे वकील तौहीद खान आणि सचिव यासीन यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचे समर्थन केले. ते म्हणाले की सोशल मीडियावर केलेली पोस्ट पूर्णपणे योग्य आहे. हिंदू बाजूने शिवलिंग म्हणून जे सांगितले जात आहे. ते शिवलिंग नसून तुटलेल्या कारंजाचा भाग आहे,

व्हायरल झालेला व्हिडिओ

शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक - अंजुमन व्यवस्था मस्जिद कमिटीचे सचिव यासीन म्हणाले, की ज्याला शिवलिंग म्हटले जाते, ते कारंज्याचा भाग आहे. शिवलिंग नाही. ते फार पूर्वीच खराब झाले होते. यासीन म्हणाले की, या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी त्याची शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक आहे.

16 तासांपेक्षा जास्त रेकॉर्डिंग- विशेष म्हणजे ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आयोगाच्या कारवाईनंतर अचानक शिवलिंगाची माहिती मिळाल्याने तलाव सील करण्यात आला आहे. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी व्हिडिओग्राफी करून ४ दिवस झाले आहेत. व्हिडिओग्राफीमध्ये 16 तासांपेक्षा जास्त रेकॉर्डिंग असते. हे रेकॉर्डिंग एकूण 16 मेमरी कार्डवर सेव्ह केले आहे. हे पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

हेही वाचा-Gyanvapi Masjid: ज्ञानवापी मशीदीचे सर्वेक्षण! सर्वेक्षणाचे काम अर्धवटच; उद्याही होणार सर्वे

हेही वाचा-Gyanvapi area Survey : सर्वेक्षणाविरोधात ज्ञानवापी मशीद व्यवस्थापनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

हेही वाचा-AIMPLB on Gyanvapi case : मुस्लीम अन्याय सहन करणार नाही.. ज्ञानवापी परिसरातील कारवाईवर एआईएमपीएलबी ने व्यक्त केली नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.