नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. ईडीने कोणतीही कारवाई करू नये (No coercive action) असे आदेश द्यावेत, अशी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. कोणतीही कारवाई करू नये, त्याचा अर्थ तपासात स्थगिती नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांना कोणताही दिलासा नाही.
ईडीने मनी लाँड्रिग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली.
हेही वाचा-काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू
सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्यासमोर अनिल देशमुख यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांनी सुनावणीत म्हटले, की अनिल देशमुख यांनी तपासात सहकार्य करावे. जर त्यांना आदेशाबाबत काही अडचण असेल तर ते सामान्य अर्ज दाखल करू शकतात.
अटकेवर संरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने केले होते स्पष्ट
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच अमान्य केली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीस ए. एम. खानविलकर यांनी सुनावणी घेतली होती.अटकेपासून संरक्षण मिळणार (coercive action) नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने म्हटले आहे.
हेही वाचा-तालिबानने जिंकला अफगाणिस्तान ... संयुक्त राष्ट्रसंघाने आज बोलाविली आपात्कालीन बैठक
100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी करून 4 कोटींची संपत्तीही जप्त केली आहे. तसेच त्यांना आतापर्यंत 5 वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, यावेळी देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून ECIR ची कॉपी देण्यात यावी, त्यांना जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा-भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदुत कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक
यापूर्वी 4 समन्स, ईडीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला नकार देत बजावले होते तिसरे समन्स -
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडून पाच समन्स बजावण्यात आले आहेत. पहिल्या दोन समन्सला ते ईडीसमोर हजर झाले नाही. देशमुखांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते, की त्यांचे वय ७२ वर्षे असून ते अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत. कोरोनामुळे त्यांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या चौकशीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची विनंती केली होती. तर आता पाचव्या समन्सलाही देशमुखांनी पत्र लिहून माहिती मागवली आहे.
देशमुखांच्या खाजगी सचिव आणि सहायकाला ईडीने केले आहे अटक -
ईडीने काही दिवसांपूर्वीच देशमुख यांच्या नागपूर आणि मुबंई येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांची चौकशी ईडी करत आहे. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे