मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानीने महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनवर टीका केली आहे. राज्यात सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंधांना सुरुवात झाली. यावर अनमोल अंबानीने टि्वट केले. थेट अंबानी कुटुंबातुन लॉकडाऊनवर टीका झाल्यानं याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अत्यावश्यक सेवामध्ये नेमकं काय मोडते? अभिनेते चित्रपटाचे शुटिंग करत आहेत. राजकीय नेते सभांचे आयोजन करत आहेत. किक्रेटरही रात्री सराव कराताय. मात्र,उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत. उद्योग काम हे अत्यावश्यक नाही, असे टि्वट अनमोल अंबानीने केले आहे.
महाराष्ट्रात कडक निर्बंध -
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राज्यात सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यसरकरकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर सरकारी कार्यलयात केवळ 50 टक्के उपस्थिती असणार आहे. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री 8 ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
हेही वाचा - पाहा फोटो : काश्मीरात जगातील सर्वांत उंच पूल