ETV Bharat / bharat

आधी मैत्री, नंतर ब्लॅकमेल, चक्क 300 तरुणी... या तरुणाने तब्बल 300 तरुणींशी ठेवले संबंध, नंतर फसवले - तरुणाने तब्बल 300 महिलांना केले ब्लॅकमेल,

आंध्र प्रदेश पोलिसांनी 300 पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 23 वर्षीय के सी. प्रसन्ना कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये 200 तरुणी आणि 100 विवाहित महिला आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातील होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

ब्लॅकमेल
ब्लॅकमेल
author img

By

Published : Aug 4, 2021, 6:25 PM IST

Updated : Aug 4, 2021, 7:09 PM IST

कडप्पा(आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेश पोलिसांनी 300 पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 23 वर्षीय के सी. प्रसन्ना कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये 200 तरुणी आणि 100 विवाहित महिला आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातील होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

300 महिलांना अडकवले आपल्या जाळ्यात

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रसन्ना सुरुवातीला महिलांसोबत मैत्री करत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. थोड्या दिवसांनी त्यांच्याशी संबंध बनवत होता आणि नंतर ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होता. आरोपी तरुण हा आंध्रप्रदेशमधील कडप्पा येथील रहिवासी आहे. आरोपीने 2017 साली बीटेकचे शिक्षण सोडत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. तेव्हापासून आतापर्यंत आरोपीने जवळपास 300 महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले आहेत. आंध्रामध्येच नाहीतर तेलंगाणाच्या तरुणींनाही आपल्या जाळ्यात अडकवले आहेत.

यापुर्वीही घरफोडी, तोडफोडीप्रकरणी होता अटकेत

पोलिसांच्या माहितीनुसार, आपोपी तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करत होता. नंतर त्यांच्यासोबत संबंध बनवत होता आणि नंतर ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे वसूल करत होता. या पैशांचा उपयोग तो आपले शौक पूर्ण करण्यासाठी करत होता. यापुर्वी आरोपी प्रसन्ना कुमारला घरफोडी आणि तोडफोडी प्रकरणाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर पैसे कमावण्यासाठी त्याने तरुणींना फसवणे सुरु केले. प्रसन्नाला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, चौकशीत ब्लॅकमेलिंगचा खुलासा झाला. चौकशीत आरोपीने हैदराबाद, विजयवाडा आणि कडप्पाच्या जवळपास 300 तरुणींची फसवणूक केल्याची कबूली दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी जवळपास सव्वा लाखांची कॅश आणि 30 ग्रॅम सोने जप्त केले आहे. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडितांना समोर येऊन आरोपीविरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.

Last Updated : Aug 4, 2021, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.