अमरावती: मुलांच्या करियरबाबत पालकांना नेहमीच प्रचंड अपेक्षा असतात. पण, या अपेक्षांनी मर्यादा ओलांडली तर काय होऊ शकते, याचे उदाहरण दाखवून देणारी घटना समोर आली आहे. चित्रपटसृष्टीची आवड असलेल्या आईला आपल्या मुलीला अभिनत्री बनवायचे होते. मुलगी शरीराने मोठी व्हावी, यासाठी आईने मुलीला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. वेदना सहन न झालेल्या पीडितेने अखेर चाइल्डलाइन विभागाकडे तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. ही घटना आंध्रप्रदेशमधील विजयनगरमध्ये घडली आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या राज्य अध्यक्ष केशली अप्पाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयनगरमध्ये चाळीस वर्षांची महिला राहते. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर पहिल्या पतीचे निधन झाले. त्यामुळे तिने दुसरे लग्न केले. दोन मुले झाल्यानंतर दुसरा पती तिला मुलांसह सोडून गेला. ती सध्या तिसऱ्या पुरुषासोबत राहते. पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलीने (१५) नुकतीच विशाखापट्टणम येथील सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. उन्हाळ्याची सुट्टी घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आले की कोणीतरी अनेकदा त्याच्या आईकडे घरी येते. मात्र, त्या पुरुषाला तेथे राहायचे नाही. यावरून दोघांचे भांडण होत असे.
पुरुषाच्या सूचनेनुसार इंजेक्शन देण्यास सुरुवात: एके दिवशी त्या पुरुषाने पीडितेला पाहिले. अभिनेत्री होण्यासाठी तिच्यात गुण असल्याचे सांगितले. पण काही अवयव विकसित व्हायला हवेत, असे पीडितेच्या आईला सांगितले. त्याच्या सूचनेनुसार आईने आपल्या मुलीला दररोज इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेत पीडिता आजारी पडली. वेदना सहन न झाल्याने तिने आईला इंजेक्शन न देण्याची विनवणी केली. तरीही निदर्यी आईने मुलीला इंजेक्शन देणे सुरुच ठेवले.
पोलिसांना गुन्हा नोंदविण्याच्या सूचना: त्रास सुरुच राहिल्याने काय करावे हे पीडितेला समजले नाही. अखेर कंटाळून पीडितेने रात्री १०९८ वर फोन करून चाइल्डलाइन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य घेत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेतले. तिला विशाखापट्टणम येथील स्वाधार होममध्ये पाठवण्यात आले. राज्य बाल हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षा केशली आप्पाराव यांनी या घटनेबाबत पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास सांगितले आहे.
हेही वाचा-