श्रीनगर Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील गडोल परिसरातील (कोकेरनाग) जंगलात सुरू असलेल्या चकमकीचा सोमवारी आज सहावा दिवस आहे. विषेश म्हणजे ही चुकमक 13 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. त्यादरम्यान त्यात भारताचे तीन जवान, कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष ढोणक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून मुझामिल भट यांच्यासह एक जवान हुतात्मा झाले होते. तर एक जवान अजूनही बेपत्ता आहे.
जंगलात लपून बसले दहशतवादी : यात दहशतवाद्यांची कोणतीही जीवितहानी झाल्याचं अधिकृत वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. ज्या घनदाट जंगलात दहशतवादी लपून बसले आहेत, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दल ड्रोन, हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. हे ऑपरेशन चकमक 2008 नंतरची तिसरी सर्वाधीक काळ चाललेलं ऑपरेशन आहे.
"काल रात्री सुरक्षा दलांना चकमकीच्या ठिकाणाहून एक जळालेला मृतदेह मिळालाय. कपड्यांवरून तो एका अतिरेक्याचा मृतदेह असल्याचं दिसतंय, पण डीएनए चाचणीनंतरच स्पष्ट चित्र समोर येईल. एक सैनिकही बेपत्ता आहे; त्याचा शोध सुरू आहे,” असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतला सांगितलं.
ऑपरेशनसाठी ड्रोन, हेलिकॉप्टरचा वापर : अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की, "सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशनसाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडोची एक विशेष तुकडी तैनात केली आहे, मात्र दहशतवाद्यांना पकडण्यात आम्हाला फारसं यश आलेलं नाही. सुरक्षा दलांमधील समन्वय उत्कृष्ट आहे. पोलीस अधिकारी म्हणाले. सैन्याने ऑपरेशनला एका विशिष्ट क्षेत्रापर्यंत मर्यादित करण्यात यश मिळवले आहे. ऑपरेशनल अडचणींबद्दल बोलताना अधिकारी म्हणाले की, हा परिसर डोंगराळ असल्यानं अतिरेक्यांना फायदा होतोय. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचाही आतापर्यंतच्या ऑपरेशनवर परिणाम झाल्याचं ते म्हणाले. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, आज सर्च ऑपरेशन संपण्याची शक्याता आहे.
72 तासांपासून चकमक सुरूच : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागच्या जंगलात 72 तासांपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जोरदार हल्ला करण्यात येत आहे. शुक्रवारी घनदाट झाडांच्या मागे लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर रॉकेट लाँचर, हेक्साकॉप्टर ड्रोनमधून बॉम्बफेक करण्यात आली. घेरावात अडकलेल्या दहशतवाद्यांची संख्या दोन ते तीन असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -
- Parliament Special Session २०२३ : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवसाचा प्लॅन
- Shiv Sena Petition Live updates : एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घ्यावी-सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- Congress Six Guarantees Telangana : विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणातील जनतेसाठी सोनिया गांधींनी सांगितली 'सहा सूत्री' योजना