ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : भाजपात अंतर्गत बंडाळी.. अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत - सावित्री कवलेकर

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) तोंडावर भाजपला अंतर्गत कलहाचा फटका ( Rebellion Within BJP ) बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपले तिकीट कापले जाईल या भितीने अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत ( BJP Leaders Preparing To Leave Party ) आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

भाजपात अंतर्गत बंडाळी
भाजपात अंतर्गत बंडाळी
author img

By

Published : Jan 6, 2022, 3:45 PM IST

पणजी - विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) तोंडावर भाजपला अंतर्गत कलहाचा फटका बसण्याची शक्यता ( Rebellion Within BJP ) वर्तविण्यात येत आहे. आपले तिकीट कापले जाईल, या भितीने अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत ( BJP Leaders Preparing To Leave Party ) आहेत. काहीजण थेट तर काहीजण सोशल माध्यमाच्या माध्यमातून सरकारवर विधानसभा तिकिटासाठी दबाव टाकत आहे.

भाजपात अंतर्गत बंडाळी.. अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत
एक नजर राज्यातील भाजपा नाराजांवर

मायकल लोबो

गोव्याच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणजे मायकल लोबो ( MLA Michael Lobo ). लोबो हे बारदेश तालुक्यातील मंत्री व आमदार आहेत. पत्नी डिलियाना लोबो ( Delilah Lobo ) यांना शिवोली मतदारसंघातून ( Shivoli constituency ) निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी लोबो इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारी ही मागितली. मात्र, भाजपने त्यास नकार दिला. त्यामुळे लोबो हे मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे गुणगान गात आपल्याच पक्षावर टीका करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून फक्त शिवोलीसाठी आग्रही असणारे लोबो आता मात्र पूर्ण बारदेश तालुक्यात आपल्या समर्थकांना तिकीट मिळावे यासाठी लोबो इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी Together for Barsesh चा नारा देत भाजपवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

बाबू आजगावकर

पेडण्याचे आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर ( Deputy CM Babu Ajgaonkar ) यांचा 2022 च्या निवडणुकीत भाजपकडून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजगावकर यांच्यावर पेडण्याची जनता विविध कारणांमुळे नाराज आहे. त्यात रोजगार, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग जमीन हस्तांतरण आदी प्रश्नचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजपने नुकतेच मगो पक्षातून प्रवीण आरलेकर यांना आयात केले आहे. त्यामुळे आजगावकर अधिकच नाराज आहेत. त्यातच 2017 ला महाराष्ट्र गोमंतक पक्षातून ( Maharashtra Gomantak Paksh ) निवडून आलेले आजगावकर 2019 ला भाजपवासी झाले. त्यामुळे 2022 ला पेडणेकर त्यांना कितपत स्वीकारतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उत्पल पर्रीकर

माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर ( Ex CM Manohar Parrikar ) यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर ( Utpal Manohar Parrikar ) 2022 ची निवडणूक भाजपच्या वतीने पणजी मतदारसंघातून लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षाने बाबुश मोन्सरात ( MLA Babush Monserrate ) यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब केल्यामुळे पर्रिकर नाराज आहेत. त्यातच मंगळवारी पणजीत झालेल्या भर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( CM Dr Pramod Sawant ) यांनी मोन्सरात यांची पाठ थोपटल्यामुळे उत्पल पर्रीकर अधिकच नाराज झाले आहेत. त्यातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून, आत्ता मागे वळून पहायचे नाही असा इशाराच भाजपला दिला आहे.

सावित्री कवलेकर

दक्षिण गोव्यातील भाजपचे उपमुख्यमंत्री बाबू कवलेकर यांच्या पत्नी सावित्री कवलेकर ( Savitri Kavlekar ) या सांगे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तसे त्यांनी भर सभेत जाहीरही केले. मात्र, इथून भाजपची उमेदवारी माजी आमदार सुभाष फलदेसाई ( Ex MLA Subhash Faldesai ) यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री असणाऱ्या कवलेकर यांच्या पत्नीने सांगे मतदारसंघात आपली वेगळी चूल मांडल्यास त्याचा भाजपला फार मोठा फटका बसू शकतो.

दरम्यान, मंत्री मायकल लोबो सध्या परस्पर विरोधी भाष्य करून आपण पार्टीसोबत आहे. मात्र, कोणत्या पार्टी सोबत आहे यावर मात्र त्यांनी भाष्य टाळले. गुरुवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत मंत्री लोबो यांनी भविष्यात योग्य निर्णय घेऊ, असे देखील सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.