ETV Bharat / bharat

2020 मध्ये सरासरी रोज 418 जणांची आत्महत्या, देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात! - etv bharat maharashtra

2020 मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित 10,677 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामधील 5,579 शेतकरी तर 5098 हे शेतमजूर आहेत. कृषी क्षेत्रातील व्यक्तींचे आत्महत्येचे प्रमाण हे देशातील आत्महत्येच्या प्रमाणात 7 टक्के आहे.

आत्महत्या आकडेवारी
आत्महत्या आकडेवारी
author img

By

Published : Oct 29, 2021, 8:03 PM IST

नवी दिल्ली - देशातील आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वर्ष 2020 मध्ये सरासरी रोज 418 व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामधील 10,677 लोक हे कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रमाण देशात सर्वाधिक राहिल्याचे दिसून आले आहे.

एनसीआरबी ही केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करते. या संस्थेने वार्षिक अहवालात देशातील आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. 2019 मध्ये देशात 1,39,123 जणांनी आत्महत्या केल्या असल्याचे नॅशन क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) वार्षिक आकडेवारीत म्हटले आहे. त्या तुलनेत 2020 मध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 2020 मध्ये देशात 1,53,052 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आत्महत्येचे प्रमाण 10.4 टक्क्यांवरून 11.3 टक्के झाले आहे.

हेही वाचा-२०१९ मध्ये ४३ हजार मजूर व शेतकऱ्यांनी संपवले जीवन.. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात - NCRB

एकूण आत्महत्येपैकी कृषी क्षेत्रात 7 टक्के आत्महत्या

2020 मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित 10,677 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामधील 5,579 शेतकरी तर 5098 हे शेतमजूर आहेत. कृषी क्षेत्रातील व्यक्तींचे आत्महत्येचे प्रमाण हे देशातील आत्महत्येच्या प्रमाणात 7 टक्के आहे. आत्महत्या केलेल्या 5579 शेतकऱ्यांपैकी 5,335 पुरुष तर 244 महिला आहे. तर शेतमजुरांमधील आत्महत्येपैकी 4,621 पुरुष तर 477 महिला आहेत.

आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात

  • आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात राहिले आहे. महाराष्ट्रात 19,909 जणांनी आत्महत्या केली आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूमध्ये 16,883, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये 13,103 तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये 12,259 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील एकूण आत्महत्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रमाण हे 13 टक्के राहिले आहे.
  • देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एकूण आत्महत्येच्या प्रमाणात केवळ 3.1 टक्के आत्महत्या झालेल्या आहेत.
  • केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीमध्ये आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक (3,142) आहे.

हेही वाचा-शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पुढे; फडणवीस सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर

दरम्यान, मागील वर्षात देशातील 53 महानगरांमध्ये 23,855 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढले होते प्रमाण

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य देशात सर्वात पुढे असल्याचे समोर आले होते. २०१९मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालात समोर आले होते. यासोबतच, देशातील सरासरी शेतकरी आत्महत्यांचा दर कमी झाल्याचेही या अहवालात म्हटले होते.

हेही वाचा-धक्कादायक! वर्ष २०१८ मध्ये १२,९३६ बेरोजगारांच्या आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.