ETV Bharat / bharat

Violent Protest In Amritsar: अमृतसरमध्ये हिंसक निदर्शने.. पोलीस ठाण्याचाच घेतला ताबा.. अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी - स्वयंभू धर्मगुरु अमृतपाल सिंह

'वारीस पंजाब दा'चे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अमृतसरमधील अजनाला पोलीस स्टेशनच्या बाहेर तलवारी आणि बंदुकांसह पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनबाहेर मोठा जमाव जमला होता. आंदोलकांनी यावेळी पोलीस ठाण्याचाच ताबा घेतला. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

amrit pal singh supportes violent protest in amritsar punjab
अमृतसरमध्ये हिंसक निदर्शने.. पोलीस ठाण्याचाच घेतला ताबा.. अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
author img

By

Published : Feb 23, 2023, 4:02 PM IST

Updated : Feb 23, 2023, 4:55 PM IST

पोलिसांशी वाद झाल्यानंतर समर्थक हिंसक झाले होते.

अमृतसर (पंजाब): पंजाबच्या अमृतसरमधील अजनाळा येथे गुरुवारी हिंसक निदर्शने झाली. 'वारिस पंजाब दा'चे अध्यक्ष अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन केले. जमावाने बॅरिकेड्सही तोडले. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर नोंदवल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी अमृतपालचे अनुयायी मोठ्या संख्येने अजनाळा येथील पोलीस ठाण्यासमोर जमू लागले होते. पोलिसांशी वाद झाल्यानंतर समर्थक हिंसक झाले होते.

एफआयआर रद्द करण्याची मागणी: अमृतपाल आणि त्याचे साथीदार अजनाळा पोलिस ठाण्यात पोहोचू नयेत, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता आणि बॅरिकेड्सही लावले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच जिल्ह्यांतील पोलिसांचा फौजफाटा अजनाळ्यात तैनात करण्यात आला आहे. अमृतपालने असा इशारा दिला होता की, सरकारने त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला नाही, तर आपण अजनाळा येथे सभा घेऊन न्यायालयात जाऊन अटकेची मागणी करू.

  • #WATCH | Punjab: Supporters of 'Waris Punjab De' Chief Amritpal Singh break through police barricades with swords and guns outside Ajnala PS in Amritsar

    They've gathered outside the PS in order to protest against the arrest of his (Amritpal Singh) close aide Lovepreet Toofan. pic.twitter.com/yhE8XkwYOO

    — ANI (@ANI) February 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपहरण आणि मारहाण केल्याची तक्रार: चमकौर साहिब येथील रहिवासी वरिंदर सिंग यांनी अमृतपाल आणि त्यांच्या अनुयायांवर एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अजनाला येथे गेले असता त्यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अमृतपालने आरोप नाकारले आणि असा दावा केला की, पोलिसांनी मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याच्या आणि त्याच्या अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे, जो आधीच त्याच्या गटाच्या विरोधात चुकीचे समज पसरवत होता. मात्र, तो निर्दोष असून, त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

पोलीस कर्मचारी गंभीर जखमी: अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. ही चकमक जिथे झाली तिथे वारिस पंजाब संघटनेचे नेते अटकेसाठी आले होते, त्यांच्यासोबत मोठा ताफा होता. अमृतपालने सांगितले की, त्याचा सहकारी तुफान सिंग याला अटक करण्यात आली असून, त्याचा छळ करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात हा संपूर्ण ताफा अजनाळे पोलीस ठाण्याला घेराव घालून अटकेसाठी आला होता. दरम्यान, आंदोलकांनी पोलिस ठाण्यात घुसून पोलिसांवर हल्ला केला, ज्यात अनेक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. निहंग शिखांनी पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचाही प्रयत्न केला.

अमृतपाल सिंगचा जवळचा मित्र लवप्रीत तोफानच्या अटकेचा निषेध: पंजाबमधील खलिस्तान समर्थक संघटना 'वारीस पंजाब दे'चे समर्थक अमृतपाल सिंगचा जवळचा मित्र लवप्रीत तोफानच्या अटकेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. अमृतसरमध्ये हजारो संतप्त लोकांनी बंदुका, तलवारी आणि लाठ्या घेऊन पोलीस स्टेशनला घेराव घातला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावले असता ते तोडून पोलिस ठाण्यात घुसले.

हेही वाचा: Pawan Khera Arrested: काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना अंतरिम जामीन, आसाम पोलिसांनी केली होती अटक

Last Updated : Feb 23, 2023, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.