ETV Bharat / bharat

Amritpal Singh : अमृतपालचा साथीदार पापलप्रीत याला दिल्लीतून अटक - पापलप्रीत

अमृतपाल सिंगचा साथीदार पापलप्रीतला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाईदरम्यान अमृतपालचा सहकारी पापलप्रीत सिंग याला अटक केली आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमध्ये पापलप्रीत सिंग अमृतपालसोबत होता आणि आता त्याच्या अटकेनंतर पोलीस अमृतपाललाही लवकरच अटक करू शकतात.

Amritpal Singh
अमृतपाल सिंग
author img

By

Published : Apr 10, 2023, 2:52 PM IST

Updated : Apr 10, 2023, 3:52 PM IST

नवी दिल्ली : फरारी अमृतपाल सिंगचा सर्वात जवळचा विश्वासू साथीदार पापलप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाईदरम्यान पापलप्रीतला दिल्लीतून अटक केल्याची बातमी आहे.

अमृतपाललाही लवकरच अटक होणार : पंजाब पोलिसांनी 18 मार्च रोजी अमृतपाल विरोधात केलेल्या कारवाईनंतर पापलप्रीत सिंग अमृतपाल सिंगसोबत फरार झाला होता. कथित फोटोंमध्ये तो अमृतपालसोबत सर्वत्र दिसत होता. अमृतपाल फरार झाल्यापासून पापलप्रीत सावलीप्रमाणे रात्रंदिवस त्याच्यासोबत होता. आता दिल्ली पोलीस आणि पंजाब पोलिसांनी समन्वय साधून पापलप्रीतला अटक केली आहे. पापलप्रीतच्या अटकेनंतर आता अमृतपालच्या अटकेची अटकळही जोर धरू लागली आहे. पापलप्रीत सिंगला अमृतपालचे प्रत्येक रहस्य माहीत असल्याने अमृतपाललाही लवकरच अटक होणार असल्याचे बोलले जात आहे.

दोघे वेगवेगळ्या ठिकाणी दिसले : 18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली तेव्हा अमृतपाल पोलिसांना चुकवून फरार झाला होता. आत्तापर्यंत त्याच्या शेकडो साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व घटनेदरम्यान अमृतपाल त्याचा जवळचा मित्र पापलप्रीतसोबत फरार झाल्याची बातमी समोर आली. पापलप्रीतने त्याला सर्वत्र मदत केली आहे. मार्च महिन्यापासून राजधानी दिल्लीसह पंजाब आणि इतर राज्यांतून आलेल्या अमृतपालच्या संशयास्पद चित्रांमध्ये अमृतपालसह पापलप्रीत सर्वत्र सावलीसारखा दिसत होता. त्यामुळेच तो पंजाब पोलिसांच्या रडारवर होता.

पापलप्रीतवर एनएसए दाखल : पापलप्रीतने अमृतपालच्या सर्व कारवायांमध्ये त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमृतपालच्या कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पापलप्रीत सिंगविरुद्ध पोलिसांनी एनएसएचा गुन्हाही दाखल केला आहे. या गंभीर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर पापलप्रीतचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. आता अखेर पापलप्रीतला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Attack on Namazis in Haryana : हरियाणात नमाज अदा करणाऱ्यांवर हल्ला, अनेक जण जखमी, गावात पोलीस बंदोबस्त तैनात

Last Updated : Apr 10, 2023, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.