ETV Bharat / bharat

Punjab Police on Amritpal Singh : अमृतपालचा 'आयएसआय'शी संपर्क; खासगी लष्कर तयार करण्याच्या होता तयारीत, पोलिसांनी दिली माहिती

पंजाबचा मोस्ट वाँटेड 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल देशात आहे की देशातून पळून गेला आहे, याची कोणालाच कल्पना नाही. अमृतपालच्या वडिलांनी आपल्या मुलासोबत काही अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, अमृतपालचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्क आहे. त्याचा निधीही आला आहे. अमृतपालच्या चार साथीदारांना आसामला नेण्यात आले आहे. अमृतपाल हा एकेएफ नावाची खासगी लष्कर तयार करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Amritpal Singh
अमृतपाल सिंह
author img

By

Published : Mar 19, 2023, 10:36 PM IST

नवी दिल्ली : अमृतपाल सिंह प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्याप फरार आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्या सात समर्थकांना अटक केली आहे. हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. अमृतपाल सिंग आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय यांच्यात संबंध असल्याचे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच अमृतपालचा खासगी लष्कर तयार करण्याच्या तयारीत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. बलजिंदर सिंग, गुरवीर सिंग, गुरलाल सिंग, अमनदीप सिंग, अजयपाल सिंग, सवरीत सिंग आणि हरमिंदर सिंग अशी सात समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

अमृतपालला मिळाला कोट्यवधींचा निधी : अमृतपालचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलसीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर आहेत. कलसी अनेकदा पाकिस्तानबद्दल बोलत असे. कलसी ज्या क्रमांकावरून बोलत असे, त्या क्रमांकावरून त्याला ३० कोटी रुपयांचा निधीही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

इटंरनेट सेवा बंद : पोलिसांनी अमृतपाल प्रकरणी माहिती दिली की, अमृतपालचा पाठलाग करत असताना चार-पाच मोटारसायकलस्वारांनी मुद्दाम पोलिसांच्या ताफ्यासमोर उभ्या केल्या होत्या, जेणेकरून तो पळून जाऊ शकेल. हा सुनियोजित कट होता. सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यामध्ये पोलीस अमृतपालच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहेत. पोलिसांनी दावा केला की, त्याने 25-30 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या घटनेबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, खोट्या बातम्या पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे.

नेमका अमृतपाल आहे कुठे? : जालंधरच्या डीआयजींनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अमृतपाल ज्या कारमध्ये होता त्यात एकूण चार जण होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमृतपालने पळून जाताना अनेक वेळा वाहन बदलले. शिवाय त्याचा नंबरही बदलला, जेणेकरून त्याचा माग काढता येणार नाही. अमृतपाल अजूनही देशात आहे की देशाबाहेर गेला आहे, याचे उत्तर पोलिसांनी दिलेले नाही.

अमृतपाल फरार म्हणून घोषित : मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना अमृतपालच्या घरातून आनंदपूर खालसा फोर्सचे जॅकेट सापडले. याचा अर्थ तो आनंदपूर खालसा फोर्स तयार करण्याच्या तयारीत होता. हे एखाद्या खाजगी सैन्यासारखे आहे. अमृतसरच्या ग्रामीण एसपीचे एक वक्तव्य मीडियात आले आहे. यामध्ये तो दावा करत आहे की, अमृतपालच्या साथीदाराकडून 100 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी अमृतपालला यापूर्वीच फरार घोषित केले आहे. शेजारील राज्य हिमाचल प्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार साथीदार आसाममध्ये : अमृतपालच्या चार साथीदारांना आसामला नेण्यात आले. तेथे त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमृतपाल सिंगच्या साथीदारांना आसामला पाठवण्यात आले आहे. पंजाबचे पोलीस अधिकारी तेजबीर सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. याबाबत दिब्रुगढचे पोलीस अधीक्षक श्वेतांक मिश्रा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जी काही माहिती हवी आहे ती सांगण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

अमृतपालसिंह प्रकरण : गेल्या महिन्यातच अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. यामध्ये त्यांचे समर्थक तलवारी फिरवत होते. त्यांच्याकडे बंदुकाही होत्या. अमृतपालने आपल्या एका साथीदार लवप्रीत सिंगला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. या घटनेत अनेक पोलीस जखमीही झाले आहेत. अजलाना पोलिस ठाण्याची ही घटना होती.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात चर्चा : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यात 2 मार्च रोजी बैठक झाली. याच बैठकीत अमृतपालच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तेव्हा केंद्राने पंजाबला जे काही केंद्रीय सैन्य लागेल ते देऊ असे आश्वासन दिले होते. तेव्हापासून अमृतपालच्या विरोधात नाका आणखी घट्ट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमृतपालच्या वडिलांचे वक्तव्य : या संपूर्ण घटनेदरम्यान अमृतपालच्या वडिलांचे वक्तव्यही माध्यमांत आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अमृतपालच्या मागे का लागले आहेत हे त्यांना माहीत नाही. त्यांनी सांगितले की आमचा मुलगा ड्रग्जपासून मुक्त होण्यासाठी काम करतो. वडिलांनी असेही सांगितले की मला संशय आहे की पोलिस त्याच्यासोबत काहीतरी चुकीचे करत असतील.

शेतकरी आंदोलनात चर्चेत : वारिस पंजाब दे ही अमृतपालची संघटना शेतकरी आंदोलनादरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर खालसा ध्वज फडकवला. पोलिसांनी या संघटनेच्या 78 हून अधिक लोकांना अटक केली आहे. आपण भारतीय नागरिक नसल्याचा दावाही अमृतपालने केला आहे.

हेही वाचा : Amritpal Singh News : पंजाब पोलिसांना चकमा देऊन पळाला अमृतपाल सिंह, फरार घोषित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.