ETV Bharat / bharat

Asaduddin Owaisi Attack : ओवेसी हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह आज संसदेत देणार निवेदन - ओवेसी गोळीबार अमित शाह संसद

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात ( Asaduddin Owaisi Attack ) आला होता. त्यात ते बचावले होते. आता याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह संसदेत निवेदन सादर ( Amit Shah On Parliment ) करणार आहेत.

Amit Shah
Amit Shah
author img

By

Published : Feb 7, 2022, 8:07 AM IST

Updated : Feb 7, 2022, 8:49 AM IST

नवी दिल्ली - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना ( Asaduddin Owaisi Attack ) घडली होती. या घटनेनंतर हा आरोपींना पकडण्यात आले आहे. आता या हल्ल्याबाबत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सविस्तर निवेदन ( Amit Shah On Parliment ) देणार असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ( Minister Piyush Goyal ) यांनी दिली.

पीयष गोयल म्हणाले की, "ओवेसीजी सुरक्षित आहे, यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आमची इच्छा आहे. हल्ल्यानंतर राज्य सरकारने तात्काळ पावले उचलली आहे. आरोपींना पकडण्यात आले असून, घटनेतील हत्यारे जप्त करण्यात आली आहे. याबाबत आज गृहमंत्री शाह सभागृहाला माहिती देणार आहेत," असेही गोयल यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलणार आहेत.

काय आहे प्रकरण?

हापूर गाझियाबाद भागातील राष्ट्रीय महामार्गावर छिजारसी टोल प्लाझाजवळ ओवेसी यांची गाडी आली असताना त्यावर गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ते बचावले. त्यानंतर ट्विट करत ओवेसी म्हणाले की, ‘‘माझ्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार करणारे तीन-चार जण होते, शस्त्रे टाकून ते सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा दुसऱ्या गाडीतून मी पुढे रवाना झालो. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी. यात कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारनेही याची चौकशी करावी," अशी मागणीही ओवेसी यांनी केली.

हेही वाचा - लता मंगेशकर दुखवटा, राज्यातील केंद्रिय बँकाही राहणार बंद

Last Updated : Feb 7, 2022, 8:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.