ETV Bharat / bharat

Amit Shah Security Lapse: नांदेडहून तामिळनाडुला पोहोचताच अमित शाह यांच्या सुरक्षेत त्रुटी, नेमके काय घडले? - अमित शाह चेन्नई दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्री महाराष्ट्राचा दौरा करून तामिळनाडू पोहोचले. चेन्नई विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर हॉटेलकडे जाताना अचानक काही अंतरावर पथदिवे बंद झाले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

Amit Shah Security Lapse
अमित शाह तामिळनाडू दौरा
author img

By

Published : Jun 11, 2023, 10:24 AM IST

चेन्नई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मोदी सरकारच्या ९ वर्षे पूर्तीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री चेन्नईला पोहोचल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाली आहे. त्यामुळे भाजप आणि तामिळनाडून सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री नांदेडहून रात्री ९.२० वाजता निघाले. ते चेन्नई विमानतळावर उशिरा रात्री पोहोचले. शाह हे विमानतळावरून त्यांच्या गिंडी येथील हॉटेलसाठी निघाले असताना विमानतळाजवळील रस्त्यावरील पथदिवे बंद झाले. हे दिवे जाणूनबुजून केल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सरकारवर केला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीतीदेखील भाजपने व्यक्त केली आहे.

  • #WATCH | Tamil Nadu: BJP leaders and workers protest as they allege sudden power off outside Chennai airport as Union HM Amit Shah comes out of the airport pic.twitter.com/9LJtw322Ns

    — ANI (@ANI) June 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अचानक वीज पुरवठा कसा खंडित झाला? रस्त्यावरील दिवे बंद करणे ही सुरक्षेतील त्रुटी समजावी, असे असे तामिळनाडू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन यांनी म्हटले आहे. पुढे, ते म्हणाले, की गृहमंत्र्यांचा आधीच निश्चित करण्यात आला होती. तरीही त्या मार्गावरील पथदिवे बंद करणे ही गंभीर बाब आहे. या प्रकाराची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. अचानक वीज पुरवठा कसा खंडित झाला? संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सरकारकडून जाणीवपूर्वक दिवे बंद केल्याचा आरोप करत आंदोलन केले आहे.

देशभरात अमित शाह यांचा दौरा: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षांतील कामगिरी लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शाह हे देशभरातील विविध शहरात कार्यक्रम घेत आहे. त्या कार्यक्रमचाच भाग म्हणून अमित शाह हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमित शाह हे रविवारी चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर दुपारी ते वेल्लोरजवळील पल्लीकोंडा येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळीच आंध्र प्रदेशला रवाना होणार आहेत.

उद्धव ठाकरेंना अमित शाह यांचे आव्हान: अमित शाह यांनी नांदेडमधील सभेत उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. मुस्लिम आरक्षण, ट्रिपल तलाक, समान नागरी कायदा अशा विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे उद्धव ठाकरेंना अमित शाह यांनी आव्हान दिले. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणात ७ मिनिटे ठाकरेंवर टीका केली. मुस्लिम आरक्षण संपविणार असल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न असल्याचेही शाह यांनी कौतुक केले.

हेही वाचा-

  1. Amit Shah Vs Uddhav Thackeray : प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा होईल पर्दाफाश, अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.