ETV Bharat / bharat

Indian Urinating In Flight : भारतीयाने केली अमेरिकन एअरलाइनच्या विमानात लघुशंका! - अमेरिकन एअरलाइनच्या विमानात लघवी

गेल्या काही महिन्यांपासून विमानात सहप्रवाशावर लघवी केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आता अशीच एक घटना न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात घडली आहे. घटनेच्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. विमानतळ पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

Indian Urinating In Flight
भारतीय नागरिकाची विमानात लघवी
author img

By

Published : Mar 5, 2023, 12:59 PM IST

नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइनच्या एका फ्लाइटमध्ये एका भारतीय प्रवाशाने अमेरिकन सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. आर्य वोहरा असे या २१ वर्षीय भारतीय तरुणाचे नाव असून तो अमेरिकेत शिकतो आहे. त्याने 4 मार्च रोजी नशेत एका अमेरिकन नागरिकावर लघुशंका केली.

प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता : विमान कंपनीने भविष्यात या प्रवाशाला विमानात बसू देणार नसल्याचे सांगितले. अमेरिकन एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, 'विमानाच्या आगमनानंतर क्रू ने सांगितले की तो प्रवासी खूप मद्यधुंद अवस्थेत होता. तो विमानाच्या क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. तो ऑपरेटिंग क्रूशी वारंवार वाद घालत होता व बसण्यास तयार नव्हता. त्यामुळे विमानाची सुरक्षा धोक्यात येत होती. शेवटी त्याने एका सहप्रवाशावर लघुशंका केली'.

सीआयएसएफच्या जवानांशी गैरवर्तन केले : लँडिंग करण्यापूर्वी अमेरिकन एअरलाइन्सच्या पायलटने विमानातील एका अनियंत्रित प्रवाशाबाबत दिल्ली एटीसीशी संपर्क साधला आणि सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर आवश्यक कारवाई करण्यासाठी सीआयएसएफला कळवण्यात आले. विमान उतरल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी त्याला विमानातून बाहेर काढले. त्यावेळी त्या प्रवाशाने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांशी देखील गैरवर्तन केले. विमानतळ पोलिसांनी त्याची दखल घेत प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

पोलिसांकडून कायदेशीर कारवाई : या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला अमेरिकन एअरलाइन्सच्या एका सहप्रवाशावर लघवी झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. आरोपी आर्य वोहरा ही अमेरिकेत शिक्षण घेत असून तो दिल्लीतील डिफेन्स कॉलनीचा रहिवासी आहे. आम्ही आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहोत.' या प्रकरणी भारताच्या विमान वाहतूक नियामकाने विमान कंपनीकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. 'आम्हाला संबंधित एअरलाइनकडून अहवाल मिळाला आहे. त्यांनी परिस्थिती व्यावसायिकपणे हाताळली आहे आणि सर्व योग्य कारवाई केली आहे', असे अधिकाऱ्याने सांगितले.

या आधी ही घडली आहे घटना : यापूर्वी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीवर एअर इंडियाच्या न्यूयॉर्क - नवी दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका ७० वर्षीय महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप झाला होता. परंतु या घटनेची तेव्हा नोंद करण्यात आली नाही. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला (DGCA) एअरलाइन क्रूने घटनेचा अहवाल देण्यास विलंब केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मिश्राला अटक केली होती.

हेही वाचा : Temple Vandalize In Australia : ऑस्ट्रेलियात पुन्हा मंदिराची तोडफोड, खलिस्तान समर्थकांनी केला हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.